Power poles uprooted by stormy winds. In the second photo, the uprooted papaya crop.
Power poles uprooted by stormy winds. In the second photo, the uprooted papaya crop. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Unseasonal Rain Damage : शिरपूर, शहादा तालुक्यात पिकांचे नुकसान; वादळी वाऱ्यासह अवकाळीमुळे शेतकऱ्यांची धांदल

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर/शहादा : शहरासह परिसरात शुक्रवारी (ता. १२) दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अर्धा तास चाललेल्या पावसादरम्यान विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याचे वादळ झाल्याने वातावरण भीतिदायक झाले होते. दरम्यान, शहादा तालुक्यात अवकाळीने पपई आणि केळी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तीन दिवसांपासून शिरपूरकरांना ऊन-सावलीचा खेळ अनुभवयास मिळतो आहे. (Dhule Unseasonal Rain Damage)

उकाड्यात वाढ झाली असून, रात्री-पहाटे गार वारेही सुटते. त्यामुळे पाऊस आता येईल, तेव्हा येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. शुक्रवारी सकाळपासून आभ्राछादित वातावरण होते. दुपारी चारला सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर काही वेळातच पावसाचे टपोरे थेंब पडण्यास सुरवात झाली. अनपेक्षित पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.

येथील बाजार समितीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक सुरू आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. शेतमाल शेडमध्ये ठेवण्यासाठी वाहने रांगेत उभी असतानाच पाऊस सुरू झाल्याने वाहन सुरक्षित स्थळी नेताना शेतकऱ्यांची धांदल झाली.

पिकांचे नुकसान

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मिरची, पापड, कुरड्या आदी वाळवणाची कामे सुरू आहेत. मात्र वादळ आणि पावसामुळे त्यातही व्यत्यय आला. पाऊस सुरू असतानाच वीजपुरवठा खंडित झाला. तो बऱ्याचशा भागात उशिरापर्यंत सुरळीत झालेला नव्हता. यापूर्वी १ मार्चला शिरपूर तालुक्यात तुफानासह पाऊस झाला होता. त्यात केळी, पपईच्या फळबागा, गहू, बाजरी, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. दरम्यान, उकडा कायम असल्यामुळे पाऊस पुन्हा येईल की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. (latest marathi news)

शहादा तालुक्यातही नुकसान

शहादा ः शहरासह परिसरात शुक्रवारी साडेचारला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे व्यावसायिकांची तारांबळ उडाली, तर काही ठिकाणी पपई, केळीचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत पावसाळी वातावरण कायम होते. ऊन व सावलीच्या खेळानंतर ढगाळ वातावरण झाले. दुपारी साडेचारला वादळी वारा सुरू झाला. त्यामुळे धुळीचे लोट उडाले.

शासकीय विश्रामगृह, पालिका परिसरात भाजीपाला विक्रेते, हॉकर्सधारकांची तारांबळ उडाली. वीजपुरवठा खंडित झाला. शहादा तालुक्याच्या पूर्वेकडे वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळीच्या बागा, पपईचे पीक जमीनदोस्त झाले. त्यामुळे उत्पादकांचे नुकसान झाले. गहू काढणीचे काम सुरू असताना शेतकऱ्यांची धांदल उडाली. गव्हाचे नुकसान झाले. वडाळी, फेस, बामखेडा, दोंदवाडे, सारंगखेडा, हिंगणी परिसरात विजांचा कडकडाट झाला.

नंतर पावसाने नुकसान केले. फेस येथे जिल्हा परिषद शाळेच्या छताचे पत्रे उडाले. बामखेडा परिसरात केळीचे नुकसान झाले, तर वीजखांबासह ट्रान्स्फॉर्मर पडला. अनेक वृक्ष उन्मळून पडले. सर्वाधिक नुकसान फेस व बामखेडा परिसरात झाले. या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक कोलमडले आहेत.

धुळ्यात उकाडा

दरम्यान, धुळे शहरासह परिसरात दुपारपासून उकाड्यात वाढ झाली. त्यात जुने कलेक्टर ऑफिस परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने व्यावसायिक त्रस्त झाले. सायंकाळनंतरही पावसाळी वातावरणाची स्थिती कायम होती. अवकाळी पावसाने धुळे शहरात गुरुवारी (ता. ११) रात्री साडेनऊनंतर पंधरा ते वीस मिनिटे हजेरी लावली होती. तेव्हापासून पावसाळी वातावरणाचे चिन्ह कायम आहे.

"वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळीचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास गेला. अस्मानी संकटामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत."-युवराज पाटील, शेतकरी, फेस

"पिकांसह इतर नुकसानीबाबत माहिती घेतली जाईल. नुकसानग्रस्त भागात तलाठी व मंडळाधिकाऱ्यांना पंचनाम्याची सूचना दिली जाईल." -दीपक गिरासे, तहसीलदार, शहादा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT