MSRTC Deaprtment News Sakal
MSRTC Deaprtment News Sakal esakal
उत्तर महाराष्ट्र

MSRTC News : दोंडाईचा आगार; 2 वर्षांपासून तोट्यात, मात्र यंदा 10 लाखांवर नफा

सकाळ वृत्तसेवा

निमगूळ : दोंडाईचा आगार दोन वर्षांपासून तोट्यात होते, मात्र एप्रिल महिन्यात दोंडाईचा आगाराने उच्चांक गाठला असून, दोन कोटी ९७ लाखांवर उत्पन्न मिळविले.

त्यातून निव्वळ आगाराचा नफा १० लाख आठ हजार इतका झाला असून, धुळे विभागात द्वितीय क्रमांक आला आहे. बसनी एकूण पाच लाख ७० हजार किलोमीटरचा प्रवास एका महिन्यात केला आहे.

गेल्या दोन कोटींच्या काळात सर्वच आगारे तोट्यात होती. कोरोना संपल्यानंतरही काही काळ महामंडळाला तोटा सहन करावा लागत होता. एप्रिल महिन्यात दोंडाईचा आगाराचे प्रमुख किशोर पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आगाराचा नफा कसा वाढेल याकडे लक्ष वेधले. (Dondaicha Bus Department In loss for two years but this year profit of one million Income of 2 crore 97 lakhs in April Dhule News)

कर्मचारी वर्गाला विश्वासात घेत परिसरात जास्तीत जास्त फेऱ्या वाढविल्या. विद्यार्थ्यांना सुट्या व लग्नसराई मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे बसफेऱ्या वाढल्या. महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांनी जास्त प्रवास केल्याने त्याची भर पडली.

तसेच किशोर पाटील यांनी नाशिक-चोपडा-अमळनेर-पाचोरा अशा जादा बस सुरू करून फेऱ्या वाढविल्यामुळे उत्पन्नात भर पडली, तसेच चालकांनी बसची विशेष निगा ठेवल्याने तब्बल चार ते पाच लाखांचे डिझेल कमी लागले.

त्यामुळे नफ्यात पुन्हा वाढ झाली असून, मे महिन्यातही दोंडाईचा आगार नफ्यात येणार आहे. कर्मचारी वर्गाची मेहनत असून, सर्वांचे योगदान असल्याने शक्य झाल्याचे आगारप्रमुख किशोर पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरमहा आगाराला नफा कसा राहील, बसस्थानकातील स्वच्छ्ता, प्रवाशांसाठी योग्य सुविधा याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे सांगितले.

"वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने आगाराचे उत्पन्न कसे वाढेल याकडे लक्ष राहणार असून, प्रवाशांसाठी जास्तीत जास्त फेऱ्या वाढविणार आहे. त्यामुळे आगाराचे उत्पन्न वाढेल."

-किशोर पाटील, आगारप्रमुख, दोंडाईचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS Live Score : चांगल्या सुरुवातीनंतर राहुल त्रिपाठी बाद, पण अभिषेक शर्मानं झळकावलं अर्धशतक; हैदराबादच्या 100 धावा पार

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

Pune Accident: दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन; पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा आहे मुलगा

SCROLL FOR NEXT