Jalgaon News : चोपड्यातील आगीची शासनाकडून चौकशी

fire news
fire newsesakal

Jalgaon News : शहरातील मेनरोडवरील राहुल एम्पोरिएम या तीन मजली कापड दुकानास ११ फेब्रुवारीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत गौरव जैन या तरुणाचा होरपळून मृत्यू झाला होता, तर लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला होता. (Government probe into Chopda fire case jalgaon news)

या घटनेच्या निषेधार्थ विविध संघटना व व्यापारी यांनी मिळून जनअक्रोश मोर्चा देखील काढला होता, तर काहींनी नगरपालिकेच्या ढिसाळ प्रशासनाविरोधात शासनाकडे तक्रारी देखील केल्या होत्या. या सर्व घटनांची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून घटनेच्या चौकशीचे आदेश काढले आहेत.

या नुसार प्रांताधिकारी अहिरे यांनी नगरपरिषदेत असणारी अग्निशमन यंत्रणा व संबंधित कार्यपद्धती याबाबत शहरातील नागरिकांकडून काही हरकती असल्यास तहसीलदार चोपडा यांच्याकडे दाखल कराव्यात, असे चौकशी समितीने कळवले होते, त्यानुसार अनेक हरकती चोपडा तहसील कार्यालयात आल्या आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

fire news
Jalgaon Market Committee Election : बाजार समिती निवडणुकीत 512 व्यापाऱ्यांना दिलासा

यासंदर्भात नेमका आकडा किती, यासाठी तहसीलदार अनिल गावित यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, आज सुटी असल्याने आपण बाहेरगावी आहोत, म्हणून नेमका आकडा सांगता येणार नाही, पण अनेक हरकती आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

fire news
Jalgaon News : संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला कधी मिळणार? शेतकऱ्यांची आर्त हाक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com