Eknath Khadse
Eknath Khadse 
उत्तर महाराष्ट्र

माझ्याबाबतीतच हॅकरवर का विश्वास ठेवला?; खडसेंचा भाजपला प्रश्न

सकाळवृत्तसेवा

जळगाव : भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या ईव्हीएम मशीनच्या माहितीमुळे झाले असल्याचे एका हँकरने म्हटले आहे. हॅकर हे खोटारडे असतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे पक्षाने सांगितले. मग माझ्या बाबतीतही हँकर मनीष भंगाळे याने माझ्यावर दाऊदसोबत संभाषण असल्याचे सांगितले होते. मग त्याच्यावर का विश्वास ठेवण्यात आला, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे केला.

एकनाथ खडसे व अंडरवर्ड डाॅन दाऊद इब्राहिम यांच्यात दूरध्वनीद्वारे संभाषण झाल्याचा व त्याचे काॅल डिटेल्स आपल्याकडे असल्याचा दावा हॅकर मनिष भंगाळे याने केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाअंती खडसे यांना क्लीन चीट दिली होती. फैजपूर येथे  पत्रकार संघाच्या उद्घाटन प्रसंगी याबाबत बोलताना खडसे म्हणाले की, त्याने माझ्यावर जे आरोप केले हे कसे खरे मानण्यात आले? त्यानंतर झालेल्या मीडिया ट्रायलमुळे मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. असे  माजी महसूलमंत्री खडसे यांनी केले. मीडिया ट्रायलमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, अशी खंतदेखील खडसे यांनी व्यक्त केली.

ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून तत्कालीन केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली असा खळबळजनक दावा लंडनस्थित संगणक हॅकर सय्यद शुजा यानं नुकताच केला होता. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मात्र, हा दाव्यात तथ्य नसून एका हॅकरवर कसा विश्वास ठेवायचा, असे सूर भाजपच्या वर्तुळात उठले होते. त्या पार्श्वभूमीवर खडसे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT