pickles Inflow of spices in market increased due to rising prices of spices
pickles Inflow of spices in market increased due to rising prices of spices esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : आर्थिक ओढाताणीतही लोणच्यासाठी लगबग; बाजारात कैऱ्यांची आवक वाढली

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : बाजार समितीसह शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर कैऱ्यांची आवक होत असली, तरी अद्याप अपेक्षित उठाव नसल्याचे चित्र आहे. दमदार पावसानंतर लोणचे टाकण्यास पसंती दिली जाते.

त्यामुळे आता हळूहळू बाजारात कैऱ्या खरेदीसाठी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, सध्या खाद्यतेलाचे भाव स्थिरावले असले तरी मसाल्यांचे भाव मात्र मोठ्या प्रमाणावर वाढल्याने गृहिणींची चिंता वाढली आहे.(Even in economic drag Lagbag for pickles Inflow of spices in market increased due to rising prices of spices exercise Dhule News)

बाजार समितीसह बाजारपेठेत लोणच्यासाठी गावरान कैऱ्या दाखल झाल्या असल्या, तरी दमदार पावसानंतरच लोणचे टाकण्याला महिलांकडून पसंती दिली जाते. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. याअनुषंगाने गृहिणींनी मसाले तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लोणच्यासाठी गावरान कैरीला मोठी मागणी आहे.

या कैरीला सध्या ३० ते ४० रुपये भाव आहे. दमदार पावसानंतर कैरीला मागणी वाढेल असे कैरी विक्रेत्यांनी सांगितले. असे असले तरी गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानंतर कैऱ्या खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. शहरात सकाळीच महिला कैऱ्या खरेदीसाठी येत असल्याचे चित्र आहे. ही गर्दी आणखी वाढेल असा अंदाज आहे. गेल्या वर्षी सर्वच प्रकारच्या खाद्यतेलांचे दर उच्चांकी पातळीवर होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे लोणचे टाकताना गृहिणींचे आर्थिक गणित बिघडले होते. यंदा सद्यःस्थितीत खाद्यतेलाचे भाव स्थिरावल्याने थोडा दिलासा आहे. चार महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात खाद्यतेलाचे भाव १४० ते १७० रुपये प्रति लिटरवर स्थिरावले होते. गेल्या आठवड्यात सोयाबीन व सूर्यफूल तेलाच्या दरात प्रतिलिटरमागे ४५ ते ५० रुपयांची घसरण झाली आहे. लोणच्यासाठी विशेषतः शेंगतेल वापरण्याची पद्धत आहे. शेंगतेलाचे भावही तसे फार कमी झाले नसले तरी वाढ होत नसल्याने तेवढा दिलासा आहे.

मसाल्याचे भाव चढेच

बाजारपेठेत हिंगाचे भाव वाढले आहेत. राजस्थान, गुजरातमधून येणारे जिरे होलसेल भावात ५२० रुपये किलोवर आहे. यासह अन्य मसाल्याचे भावही तेजीत आहेत. त्यामुळे लोणच्यासाठी महिलांची मोठी आर्थिक कसरत होत आहे.

असे असले तरी वर्षभर जेवणात लोणचे हवेच असते त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात का होईना लोणचे टाकण्याची लगबग प्रत्येक घरात पाहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT