Dhule Crime News : राहुल पाटीलला त्या गुन्ह्यात दंडासह सक्तमजुरी; न्या. यास्मीन देशमुख यांचा निकाल

Rahul Patil accused in child sex crime was sentenced to hard labor along with fine dhule crime news
Rahul Patil accused in child sex crime was sentenced to hard labor along with fine dhule crime newsesakal

Dhule Crime News : बाललैंगिक गुन्ह्यातील आरोपी राहुल बाळू पाटील ऊर्फ राहुल अरुण पाटील यास जिल्हा सत्र न्यायाधीश यास्मीन देशमुख यांनी दंडासहित सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

धुळे तालुका पोलिस ठाण्यात १८ एप्रिल २०२१ ला आरोपी राहुल पाटील याच्यावर गुन्हा दाखल होता. यात त्याने एका गावात १७ एप्रिल २०२१ ला मध्यरात्रीनंतर दोनला अंगणात झोपलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. (Rahul Patil accused in child sex crime was sentenced to hard labor along with fine dhule crime news)

पीडित अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही त्याने फिर्यादीच्या ताब्यातून तिला घेऊन जाण्याच्या उद्देशाने झोपेतून उठवून बळजबरीने तिच्या गळ्यात हात टाकून, हात ओढून तसेच तोंड दाबून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

तिला ठार करण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती पीडित मुलीसह आई-वडील, नातेवाइकांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांनी तपास केला आणि आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rahul Patil accused in child sex crime was sentenced to hard labor along with fine dhule crime news
Nashik Crime: महिला बाउन्सरच्या मदतीने विवाहितेचे अपहरण; भद्रकाली ठाण्यात गुन्हा दाखल

न्या. देशमुख यांच्यासमोर कामकाज झाले. सरकारी वकील पराग पाटील यांनी पीडित मुलगी, फिर्यादी, मुलीचे काका, घटनास्थळाचे पंच तसेच तिची जन्मतारीख सिद्ध करण्याकामी मुख्याध्यापक, तपास अधिकारी मैराळे यांची साक्ष नोंदविली.

कामकाजानंतर सरकारी वकील पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत न्या. देशमुख यांनी आरोपी राहुल पाटील यास पॉक्सो कायद्यांतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी, तसेच पाच हजारांचा दंड, तो न भरल्यास एक महिन्याची साध्या मजुरीची शिक्षा, इतर कलमांन्वये तीन वर्षे सहा महिने शिक्षा व तीन हजारांचा दंड, तो न भरल्यास ९५ दिवसांची साध्या मजुरीची शिक्षा,

अन्य कलमांन्वये तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा, पाच हजारांचा दंड, तो न भरल्यास महिन्याची शिक्षा, तसेच एका कलमान्वये सहा महिने सक्‍तमजुरीची शिक्षा व एक हजाराचा दंड, तो न भरल्यास पंधरा दिवसांची साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सर्व शिक्षा या आरोपीने एकत्र भोगावयाच्या आहेत, असे निकालात नमूद आहे.

Rahul Patil accused in child sex crime was sentenced to hard labor along with fine dhule crime news
Dhule Crime News : मुलीवर लैंगिक अत्याचार; एकास 7 वर्षे सक्तमजुरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com