avinash sansare.jpg
avinash sansare.jpg 
उत्तर महाराष्ट्र

शेतकरी अविनाश झाला फायरमन 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : घरची परिस्थिती बेताचीच. डोक्‍यावर शेतीसाठी घेतलेले कर्जाचे ओझे, मात्र उराशी लहानपणापासूनच बाळगलेले देशसेवा व समाजसेवा करण्याचे स्वप्न. यासाठी कष्ट करुन काहीतरी मिळविण्याची असलेली जिद्द आणि याच जिद्दीचे मिळालेले फळ म्हणजे फायरमनची नोकरी. लहानपणापासूनच काही तरी मोठे पद मिळवण्याचा ध्यास मनाशी बाळगून ग्रामिण भागातील जळगांव, गाळणे (ता. मालेगाव) येथील अविनाश चैत्राम संसारे ह्या पंचवर्षीय तरूणाने मुंबई येथे फायरमन हे पद मिळवले आहे. 

अथक प्रयत्नानंतर मिळाले यश

घराचा गाडा ओढण्यासाठी वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच शेती व्यवसायात स्वतःला समर्पित करून अविनाशने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले व त्यानंतर बाहेरून शिक्षण घेवून बी. ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले यादरम्यान सैन्याच्या भरतीतही त्याने अनेकदा प्रयत्न केले. मात्र त्यामध्ये त्याला यश मिळाले नाही. अखेर त्यांनी काहीतरी वेगळे करण्यासाठी फायर ब्रिगेड या पदासाठी त्यांनी २०१६ मध्ये अर्ज केला. २०१७ ला अविनाशला यामध्ये यश मिळाले. त्यानंतर त्यांची निवड भायखळा (मुंबई) येथील फायरब्रिगेड मुख्यालयात फायरमन म्हणून झाली. 

समाजकार्याची आवड असल्याने कामाचा अभिमान
समाजकार्याची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांना हे काम करताना खूप अभिमानास्पद वाटते असे अविनाश आवर्जुन म्हणतो. अविनाशने वयाच्या २३ व्या वर्षीच आपले स्वप्न सत्यात उतरवले आहे. याचे आई-वडील व भावांना देखील कौतुक वाटते. त्यांच्या घरी तीन भाऊ, आई, वडील, आजी असा मोठा परिवार आहे. शिक्षणासाठी पाच ते सहा किलोमीटर अंतरपर्यंत पायपीट करून शिक्षण पूर्ण केले. फायरमन म्हणून काम करताना तो विशेषतः माणसांप्रमाणेच पक्ष्यांचीदेखील काळजी मोठया शिताफिने घेत असतो. 

काहीतरी करण्याचा ध्यास मनाशी बाळगला

लहानपणापासूनच काहीतरी करण्याचा ध्यास मनाशी बाळगून होतो घरची शेती होती. पण पाणी नसल्यामुळे कर्जाचे ओझे मोठ्या प्रमाणात वाढले होते. पण समाजसेवेची आवड असल्यामुळ फायरब्रिगेडमध्ये काम करण्यास मिळाले याचा अभिमान वाटतो. - अविनाश संसारे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT