उत्तर महाराष्ट्र

धुळे जिल्‍ह्यातही पपई फळाच्या क्षेत्रात वाढ 

जगन्नाथ पाटील

कापडणे : नंदुरबारनंतर धुळे जिल्ह्यातही पपईच्या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. पपईचे उत्पादन, मिळणारा भाव, उपलब्ध मार्केट व बांधावर येणारा व्यापारी यामुळे पपईची फळबागायत शेतकऱ्यां‍ना परवडणारी ठरत आहे. आगामी काही वर्षांत जिल्ह्यात पपईचे क्षेत्र अधिक प्रमाणात वाढणार असल्याचे उत्पादकांसह व्यापारीही सांगू लागले आहेत. पपई हमखास पैसे देणारे फळ आहे. त्यासाठी नियोजन करणेही महत्त्वाचे आहे, असे अनुभवी शेतकरी सांगतात. 

सध्या परवडणारा दर 
सध्या पपईचा खरेदी प्रतिकिलो नऊ रुपये ३० पैसे आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये प्रतिकिलो बारा रुपये दर होता. आजचा दरही परवडत असल्याचे धमाणे (ता. धुळे) येथील उत्पादक भगवान पाटील यांनी सांगितले. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे पपईचा दर निश्चित न झाल्यामुळे आर्थिक झळ शेतकरी सहन करीत आहेत. 

दिल्लीचे व्यापारी बांधावर 
धुळे तालुक्यात उत्पादित पपईला दिल्लीच्या बाजारात मोठी मागणी आहे. तेथील व्यापारी थेट बांधावर येऊन खरेदी करीत आहेत. मात्र, भाव स्थिर असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पपईच्या लागवडीला मोकळी, पाण्याचा निचरा चांगला होणारी तसेच जैवपदार्थांचा भरपूर पुरवठा असलेली जमीन चांगली असते. गाळ, खडकाळ चुनखडीच्या व जैवपदार्थांचा अभाव असलेल्या तसेच भारी काळ्या व खोलगट जमिनीत पपईची वाढ चांगली होत नाही. या पिकाबाबत पाण्याच्या निचऱ्याला फार महत्त्व आहे. जिल्ह्यातील बऱ्याच भागांत पपईसाठी योग्य जमीन आहे. 

पपई रोपवाटिका करण्याकडे कल 
चांगल्या जातिवंत पुष्कळ फळे देणाऱ्या झाडाच्या पूर्ण पिकलेल्या फळांचे बी घेऊन ते धुऊन स्वच्छ करून व सावलीत वाळवून साठवून ठेवतात. रोपे करण्यासासाठी ताजे बी नेहमी चांगले असते. लागवडीवेळी सुरवातीला दोन महिने रोपांसाठी बी पेरतात. एक हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यासाठी रोपे तयार करण्यासाठी अडीचशे ग्रॅम बी पुरेसे असते. बी सामान्यतः गादी वाफ्यात लावतात. या पद्धतीने बऱ्या‍चशा शेतकऱ्यांचा पपई रोपवाटिका तयार करण्याकडेही कल वाढू लागला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT