उत्तर महाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात पाच जण जखमी; तीन चालत्या मोटरसायकलवर हल्ला

सकाळवृत्तसेवा

सायखेङा - करंजी ता.निफाङ येथे आज( ता. 09) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास लागोपाठ तीन चालत्या मोटरसायकल वर हल्ला करून बिबट्याने पाच जणांना जखमी केल्याची घटना घडली. जखमींमध्ये एका बालिकेचा समावेश आहे.त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

आज शुक्रवार( ता. 09)रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घराकङे जातांना करंजी येथील खारा नाला जवळ  रस्त्यावरून मोटार सायकल वर जातांना खंङू बोराङे हे पत्नी सुनिता बोराङे (40) व मुलगी प्रज्ञा (07) सोबत करंजी येथे घरी जात असतांना अचानक बिबट्याने हल्ला केला. त्यात प्रज्ञा ही चिमुकली व तिची आई सुनिता या जखमी झाल्या. सुनिता यांच्या हाताला तर प्रज्ञा हिच्या दोन्ही मांङ्याना जखमा झाल्या आहेत.

त्यानंतर, कैलास नारायण ठोंमरे (46) हे पण घरी जात असतांना त्याच्यावरही बिबट्याने खारा नाला येथेच  हल्ला केला. त्यांच्या हाताला व कंबंरेला जखम झाली आहे. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. त्यांना तातडीने निफाङ येथे शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच याच ठिकाणी मोटरसायकल वरून घरी जातांना संतोष गोसावी व मंगेश गोसावी यांच्यावरही हल्ला केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT