उत्तर महाराष्ट्र

पाथर्डी फाटा भागात रानगवा आढळल्याने पळापळ

राजेंद्र बच्छाव

इंदिरानगर(नाशिक)- आज (ता.27) दुपारी 12 वाजेच्या सुमारास पाथर्डी फाटा भागातील दामोदर नगर मध्ये अचानक रानगवा आढळल्यामुळे लोकांची पळापळ झाली.  बिबट्यांची सवय असलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील पहिल्यांदाच रानगवा दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.

दुपारी या भागातील जाचक मळा येथील दर्शन सोसायटी आणि शिव पॅलेस येथील नागरिकांना हा रानगवा दिसला. सुरुवातीला रेडा असेल म्हणून कोणी लक्ष दिले नाही. मात्र त्याचे स्वरूप बघून एक-दोघांनी हा रानगवा असल्याचे सांगितल्याने सर्वांची पंचायत झाली आणि एकच पळापळ सुरु झाली.

दरम्यान नागरिकांनी भाजपचे येथील पदाधिकारी एकनाथ नवले यांनी कळवले. त्यांनी तातडीने वनविभागाला याची माहिती दिली. यादरम्यान बाजार समितीचे अध्यक्ष शिवाजी चुंबळे यांचे चिरंजीव प्रताप आणि पुतणे संतोष येथे आले आणि त्यांनी हा सकाळी त्यांच्या गौळाने येथील घराजवळ बघितल्याचे सांगितले. पाथर्डी मार्गे तो नागरी वस्तीत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. विल्होळी येथील श्याम मते यांनी देखील त्यांच्या घराच्या गेटजवळ त्याला काल ता. 26 ला रात्री बघितल्याचे सांगितले.

वनपाल रविंद्र सोनार, वनरक्षक विजय पाटील, जी. बी पंढरे, अशोक पाळदे आणि टीमने मात्र पहिल्यांदाच या भागात रानगवा पाहिल्याचे सांगत आश्चर्य व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT