Kirti-Dusane
Kirti-Dusane 
उत्तर महाराष्ट्र

बहीण-भावाने सोबत जेवण केले अन्‌...

सकाळवृत्तसेवा

जळगाव - शहरातील मेहरुण परिसरातील रामनगर येथील कीर्ती पवन दुसाने (वय १७) या दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

रामनगर येथील पवन दत्तात्रय दुसाने सराफ बाजारात कारागीर म्हणून काम करतात. पत्नी भारती एमआयडीसी कंपनीत मजूर म्हणून कामाला जाते. मोठी मुलगी कीर्ती ही रामनगरातील श्रीराम कन्या शाळेत दहावीला तर लहान मुलगा लोकेश हा आठवीत शिकतो. मंगळवारी पती-पत्नी दोघेही नेहमीप्रमाणे कामाला गेले, तर लोकेश व कीर्ती शाळेत न गेल्याने दोघे घरीच होते.

लोकेश व कीर्ती यांनी दुपारी सोबत जेवण केले. जेवणानंतर लोकेश खेळायला निघून गेला. तासाभरानंतर खेळून आल्यावर आतून बंद असलेला दरवाजा ठोकला. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खिडकी उघडली. त्याला कीर्तीने गळफास घेतल्याचे दिसले. आरडाओरड करीत नागरिकांच्या मदतीने दरवाजा उघडला. लहान भावासह तिच्या आई-वडिलांनी घरी आल्यावर हंबरडा फोडला. रुग्णालयात आक्रोश केला. दरम्यान, नगरसेवक गणेश सोनवणे यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठून कीर्तीच्या आई, वडिलांना धीर दिला. उपनिरीक्षक राजकुमार ससाणे, देविदास सूरदास यांनी पंचनामा केला. मोबाईलवर बोलत असताना तिने जोरात मोबाईल फेकून घर बंद केले अन आत्महत्या केली, असे शेजाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT