नाशिक - हॅंगसौनिक यंत्रावर विविध स्वर वाजविताना स्वरांजय धुमाळ.
नाशिक - हॅंगसौनिक यंत्रावर विविध स्वर वाजविताना स्वरांजय धुमाळ. 
उत्तर महाराष्ट्र

'हॅण्डसॉनिक' मधून भारतीय पारंपारिक वाद्यांचे सुर

सकाळवृत्तसेवा

नाशिकच्या धुमाळ कुटुंबियांच्या संशोधनास यश, पहिलाच प्रयोग असल्याचा दावा
नाशिक - अन्य क्षेत्राप्रमाणे संगीत क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्वपूर्ण बदल झाले आहेत. रोलॅण्ड कंपनीच्या हॅण्डसॉनिक हे यंत्र याचाच एक भाग. मात्र या यंत्रावर आतापर्यंत केवळ पाश्‍चिमात्य वाद्य उपलब्ध करून दिलेले होते. मात्र नाशिकमधील स्वरांजय धुमाळ व कुटुंबियांनी संशोधन आणि प्रोग्रॅमिंगमध्ये बदल करत तबला, पखवाजपासून संभळ, दिमडी या दुर्मिळ वाद्यांपासून दाक्षिणात्य, पंजाबी, बंगाली वाद्य वाजवून दाखविले आहे. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विविध स्केलचा तबला याचप्रमाणे अन्य वाद्य घेऊन जावे लागतात. यामुळे कलावंतांची चांगलीच दमछाक होत असते. यावर काय तोडगा काढता येईल, या विचाराने साधारणत: दोन वर्षांपूर्वी स्वरांजय धुमाळ या युवा
संगीतकाराने संशोधनाला सुरवात केली. हॅण्डसॉनिक या यंत्रावर पाश्‍चिमात्य वाद्ये उपलब्ध करून दिलेली होती. या धर्तीवर आपल्याला भारतीय वाद्ये समाविष्ट करून घेता येतील काय, यावर संशोधन सुरु केले. युट्यूबसह अन्य विविध माध्यमांतून शोधाशोध केली. या दरम्यान वडील गोरखनाथ धुमाळ, काका धनंजय धुमाळ यांची मदत घेत संशोधन कार्य सुरू ठेवले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून विविध प्रकारचे पारंपारीक वाद्ये आता हॅण्डसॉनिक यंत्रावर उपलब्ध झालेले आहे.

खऱ्या-खुऱ्या वाद्यांप्रमाणे अनुभूती
या दरम्यान विविध वाद्यांचे वादन करून त्याचे प्रोग्रामींग स्वरांजय धुमाळ याने केले. प्रक्रियामध्ये उपकरणात येणाऱ्या तांत्रिक अडीअडचणींबाबत थेट कंपनीशी संपर्क करत सुधारणा करून घेतल्या. यशस्वी प्रोग्रामींगनंतर विविध वाद्ये यशस्वीरित्या वाजविता येऊ लागले आहेत. एखाद्या खऱ्या वाद्याच्या आवाजाप्रमाणेच या उपकरणातील वादनाने अनुभूती येत असल्याचे स्वरांजयचे म्हणणे आहे.

या वाद्यांचा केलाय समावेश
पारंपारीक वाद्य असलेल्या तबला, पखवाज, ढोलकी, ढोलक, ढोल-ताशा यांसह संभळ, दिमडी तसेच दाक्षिणात्य वाद्यांतील मृदुंगम, थविल, इडिक्‍का, घट्टम, पंजाबी वाद्यांतील कच्ची ढोल, बंगाली वाद्य असलेलेला खोळ यांसह मंजरा, डफ या वाद्यांचा प्रोग्रामींगद्वारे समावेश करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT