Sakal-Exclusive
Sakal-Exclusive 
उत्तर महाराष्ट्र

‘एचआयव्ही’ग्रस्त रुग्ण ‘एसटी’च्या सुविधेपासून वंचित!

सकाळ वृत्तसेवा

राज्यात पावणेतीन लाखांवर रुग्ण; अवघ्या पाच हजारांवर रुग्णांना मिळतेय सेवा
नंदुरबार - ‘एचआयव्ही’ संसर्गित रुग्णांना महिन्यातून दोन वेळा औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्या गावापासून जिल्हा रुग्णालयात यावे लागते. अशा रुग्णांना ‘एसटी’चा प्रवास महिन्यात केवळ दोन वेळा मोफत देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळातर्फे घेण्यात आला होता.

राज्यातील तब्बल दोन लाख ८१ हजार ‘एचआयव्ही’ग्रस्त रुग्णांपैकी केवळ पाच हजार ७३ रुग्णांना सेवा सुरू झाली असून, दोन लाख ७५ हजार ‘एचआयव्ही’ग्रस्त रुग्ण ‘एसटी’च्या सुविधेपासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्यातील खेड्यापाड्यांतून येणाऱ्या एचआयव्ही संसर्गित रुग्णांना प्रवासभाडे नसल्यामुळे औषधोपचारात खंड पडत होता. त्यामुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांची प्रकृती खालवत जात होती. केवळ प्रवासासाठी भाडे नसल्यामुळे अनेक रुग्णांवर योग्य उपचार न झाल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (मुंबई) आणि संलग्न संस्थांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे प्रस्ताव दिला होता. प्रस्तावाला मंजुरी देत प्रत्येक ‘एचआयव्ही’ संसर्गित रुग्णाला महिन्यातून केवळ दोन दिवस पन्नास किलोमीटर अंतरासाठी विनामूल्य बससेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पिपल लिव्हिंग विथ एसआयव्ही एड्स (पुणे) संस्थेतर्फे याबाबत पाठपुरावा करण्यात आला. राज्यात दोन लाख ८१ हजार ‘एचआयव्ही’ संसर्गित रुग्ण आहेत. त्यांना ही सेवा मिळावी, असा निर्णय झाला आहे. मात्र, राज्यात केवळ पाच हजार ७३ रुग्णांना सेवेचा लाभ दिला जात आहे. दीड लाखाहून अधिक रुग्ण सेवेपासून वंचित आहेत.

त्यांनाही सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पिपल लिव्हिंग विथ एसआयव्ही (पुणे) संस्थेचे समन्वयक विजय भेंडे यांनी ‘सकाळ’ला दिली.

नंदुरबार जिल्ह्यात पाच हजार रुग्ण 
नंदुरबार जिल्ह्यात ‘एचआयव्ही’ संसर्गित पाच हजार रुग्णांची नोंद आहे. त्यापैकी केवळ ६४९ रुग्णांना बस पासची सुविधा मिळत आहे. चार हजार ३५१ रुग्ण विनामूमूल्य बससेवेपासून वंचित आहेत. बसची विनामूल्य सेवा मिळत असलेली जिल्ह्यातील आकडेवारी अशी ः नंदुरबार आगार- २५९, नवापूर- ९३, अक्कलकुवा- १३४, शहादा- १७३. असे एकूण ६४९ ‘एचआयव्ही’ग्रस्त रुग्णांना सेवा मिळत आहे, अशी माहिती नेटवर्क ऑफ बाय पिपल लिव्हिंग विथ एचआयव्ही एड्स संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशा माळी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT