Hotelier attacked out of anger for asking for money nandurbar crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या रागातून हॉटेल व्यावसायिकांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : नंदुरबार शहरातील साक्री नाका परिसरात नाश्‍ता सेंटरवर नाश्ता करून चौघा टवाळखोरांनी पैसे न देताच निघून जात असताना हॉटेल व्यावसायिकाने पैसे मागितले.

त्याचा राग येऊन चौघांनी हॉटेल व्यावसायिक मुलगा व वडिलांवर कोयता, लोखंडी सळईने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थली पोचले. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले.

ही घटना बुधवारी (ता. १२) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. (Hotelier attacked out of anger for asking for money nandurbar crime news)

शहरातील साक्री नाका परिसरात गणेश अरुण परदेशी (वय २३) व त्याचे वडील अरुण श्रीपत परदेशी हॉटेल व्यावसाय करतात. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास शहरातील दीपक बाबूलाल सोनवणे, शंकर पवार, गोपाल शिंदे, शनी ऊर्फ काळ्या संतोष केंगार (सर्व रा. गिरीविहार गेटसमोरील होलारवाडा, नंदुरबार) तेथे आले.

त्यांनी नाश्ता मागितला. त्याप्रमाणे हॉटेल व्यावसायिक गणेश परदेशी व त्याच्या वडिलांनी ग्राहक म्हणून चौघांना नाश्ता दिला. पोटभर खाल्ल्यानंतर चौघे पैसे न देताच रफूचक्कर होण्याचा तयारीत होते. हे गणेश परदेशी यांच्या लक्षात आले. त्यामुळे गणेश परदेशी यांनी त्यांच्याकडे नाश्त्याच्या बिलाची मागणी केली.

त्यावरून शाब्दिक चकमक झाली. त्याचा राग येऊन चौघांनी व त्यांच्या काही साथीदारांनी मिळून गणेश परदेशी व तेथे उपस्थित त्यांचे वडील अरुण परदेशी यांना मारहाण सुरू केली. त्यात दीपक बाबूलाल सोनवणे याच्याकडे असलेल्या धारदार लोखंडी कोयत्याने गणेश परदेशी व सोडविण्यासाठी धावलेले त्यांचे वडील अरुण परदेशी यांच्यावर वार केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शंकर पवार याने हातात असलेल्या डेंगाऱ्याने हातापायांवर मारले व इतर दोघांनी सळईने डोक्यावर मारहाण केली. त्यात हॉटेल व्यावसायिक गंभीर जखमी झाले.

घटना घडल्यावर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस पथकासह पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन घटनास्थळी दाखल झाले. पोलिस पोचेपर्यंत हल्लेखोर पसार झाले. मात्र जखमी गणेश परदेशी व त्यांच्या वडिलांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत गणेश अरुण परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक बाबूलाल सोनवणे, शंकर पवार, गोपाल शिंदे, शनी ऊर्फ काळ्या संतोष केंगार (सर्व रा. गिरीविहार गेटसमोरील होलारवाडा, नंदुरबार) यांच्याविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde : जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रात्रीतून एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड ४५ मिनीटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Miraj Assembly Constituency : 'मिरज मतदारसंघ खुला झाला तरी मी निवडणूक लढवणारच'; आमदार खाडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, राजकीय समीकरणे बदलणार?

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा मुसळधार! 'या'१२ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी, हवामानाचा विभागाचा अंदाज

Suraj Sakhare Firing in Kolhapur : डोळ्यांदेखत गोळीबार पाहून बोबडीच वळली; टायर फुटल्यासारखा मोठा आवाज अन्..; प्रत्यक्षदर्शी कामगाराने सांगितला घटनेचा थरार

Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मगरपट्ट्याचा उड्डाण पूल पाडणार; भैरोबानाला-हडपसर ते यवत ३६.५ किमी उड्डाण पूल हाेणार, मेट्रो विस्तारालाही गती

SCROLL FOR NEXT