Jalgaon Crime News : लग्नानंतर 3 महिन्यात विवाहितेची आत्महत्या; पाचोरा येथील घटना

married women commit suicide due to torture esakal
married women commit suicide due to torture esakalesakal

Jalgaon Crime News : येथील गोविंदनगरात वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय विवाहितेने घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १३) सकाळी घडली.

याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असली तरी मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी सासरच्या जाचाला कंटाळून काजलने आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. (married women commit suicide due to torture esakal)

कुऱ्हाड तांडा (ता. पाचोरा) येथील राहुल चव्हाण यांचा विवाह लिहा तांडा (ता. जामनेर) येथील काजल राठोड (वय १९) हिच्याशी गेल्या तीन महिन्यापूर्वी झाला होता. लग्नानंतर महिनाभर सासरच्यांकडून चांगली वागणूक मिळाली. परंतु मृत काजलची आजल सासू सुग्राबाई चव्हाण, सासू मुक्ताबाई चव्हाण व चुलत सासू पार्वताबाई चव्हाण या संगनमताने किरकोळ कारणावरून काजलला टोचून बोलून तिचा मानसिक छळ करत असत.

त्यामुळे घरात भांडणे व वादविवाद होत असत. उगीच रोज वादविवाद नकोत म्हणून गेल्या १० जुलैला राहुल चव्हाण याने पाचोरा येथील गोविंद नगर भागात भाड्याची खोली घेऊन तो पत्नीसह राहावयास आला होता. परंतु येथे राहायला आल्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी काजलने घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत गुरुवारी (ता.१३) सकाळी उडी घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

married women commit suicide due to torture esakal
Jalgaon Crime News : जामनेरला क्षुल्लक कारणावरून तरुणांसह महिलांना बेदम मारहाण; परिसरात तणावपूर्ण शांतता

रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांनी काजलला लगबगीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. परंतु मृत काजलच्या माहेरच्यांनी ग्रामीण रुग्णालयात मन हेलावणारा आक्रोश करत सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून काजलने आत्महत्या केल्याची तक्रार केली. त्यामुळे सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे पोलिसांचे काम सुरू होते.

घरात रोजच होणाऱ्या भांडणाला कंटाळून राहुल पत्नी काजलसह पाचोरा येथे भाड्याच्या घरात आला असताना अवघ्या तिसऱ्या दिवशी काजलने आत्महत्या का केली असावी? नवविवाहित काजलने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे? याच्या मुळापर्यंत जाण्याचा पोलिसांनी प्रयत्न करावा, अशी मागणी काजलच्या माहेरच्यांकडून होत आहे.

married women commit suicide due to torture esakal
Jalgaon Crime News : तिने घर मागताच वजन मापाने ठेचून केला खून...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com