wani
wani 
उत्तर महाराष्ट्र

चार सरपंचासह शेकडो तरुण व महिलांचा भाजपात प्रवेश

दिगंबर पाटोळे

वणी (नाशिक) - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे पण ते देतांना आदिवाशी व ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावु नये असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. दरम्यान शुक्रवार ता. ५ रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्या हस्ते व जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थित बहुप्रतिक्षित नाशिक- वणी- कळवण या रस्त्याच्या २१४ कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे असल्याची माहिती खासदार चव्हाण यांनी दिली.

कृष्णगांव, ता. दिंडोरी येथील सास्कृंतिक सभामंडपात आज,( ता. ३) दिंडोरी तालुका भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या भाजपा प्रवेश सोहळ्याच्या अध्यक्षस्थानाहून खासदार श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी  वणी पंचक्रोशितील कृष्णगाव, अंबानेर, काजीमाळे फोफशी, बाबापुर, पुणेगाव येथिल सरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांनी खा. हरिश्चंद्र चव्हाण यासंह नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यात काजीमाळे येथिल सरपंच संजय गोतरणे, फोफशी येथिल सरपंच शांताराम गायकवाड, बाबापुर येथिल सरपंच गुलाबराव गावित, पुणेगावचे सरपंच बाळासाहेब रोंदळ आदिंचा प्रामुख्याने समावेश आहे. यावेळी श्री. चव्हाण यांनी माझ्याकडे कामं किंवा समस्या घेवुन आलेल्या लोकांना कधीच जात- पात व पक्ष व विचारता असलेसे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगुण जनतेसाठी २४ तास भ्रमणध्वनी सुरु ठेवून संवाद साधत असल्याचे सांगितले. यावेळी अंबानेर येथिल महिला दारुबंदी संघटनेच्या 18 महिला अंबानेर येथुन पक्ष प्रवेशासाठी चक्क 6 किमी. चालत आल्या. त्यांचेही खासदार चव्हाण यांनी कौतुक केले. 

यावेळी युवा आघाडीचे योगेश बर्डे, अवनखेडचे नरेद्र जाधव, महिला आघाडीच्या भारती गवळी, जिल्हा सहचिटणीस बापुसाहेब पाटील, तालुकाध्यक्ष संजय कावळे आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा महिला अध्यक्ष मंदाताई पारख, नाशिक शहर महिला उपाध्यक्षा मंगला शिंदे, प्रमोद देशमुख, काळुबाबा, काका देशमुख, राजुभाऊ शिंदे, सुनिता जाधव, सविताताई सोमवंशी, विजय पिंगळ,  वणी शहराध्यक्ष प्रकाश ठाकरे, डॉ. मधुकर आचार्य, कचरदास करवंदे, चंद्रकांत रणधिर, बापु माळेकर, कुंदन झावरे, बाळासाहेब देशमुख, कृष्णगावचे सदस्य  मनीषा शार्दूल, अलका जाधव, सीमा गांगुर्डे, सरपंच गणेश कडाले, उपसरपंच सतीश पवार, रघुनाथ घाडगे, मनोज कडाले, शिवाजी जाधव, रवींद्र घोरपडे आदीसंह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक विलास ठाकरे, सुत्रसंचालन उपतालुका प्रमुख महेंद्र पारख यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT