jalgaon
jalgaon 
उत्तर महाराष्ट्र

हुतात्मा केशव गोसावी यांच्या कुटुंबियांना जळगावातून आधार

सकाळवृत्तसेवा

नाशिक - देशाचे रक्षण करतांना प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या कुटुंबाना आधार मिळावा म्हणून जळगावातून मदतीचा हात दिला जात आहे. देशातील नागरिक सुरक्षित राहावे म्हणून सैनिक सीमेवर अहोरात्र जीवाची बाजी लावून पहारा देत असतात, प्रसंगी त्यांना विरमरणही येते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा या भावनेने जळगावातील आर्या फौंडेशन ही संस्था पुढे आली असून हुतात्म्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पासष्ट हजार रुपयांची मदत करीत आहे.

हुतात्मा केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना आधार
कुटुंबाची परिस्थिती हलाखीची ११ नोव्हेंबर २०१८ रोजी राजुरी सेक्टरमध्ये नौशेरा भागात हुतात्मा झालेल्या केशव गोसावी यांच्या कुटुंबियांना जळगावच्या आर्या फौंडेशन तर्फे रु.६५०००/- चा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी आर्या फौंडेशन नाशिकचे प्रतिनिधी ऋषिकेश परमार यांचेसह डॉ. प्रभाकर बेडसे, डॉ.शामसुंदर झळके, डॉ. सतीश साळुंखे, डॉ. विवेक जोशी, डॉ.योगेश पंजे, डॉ.नितीन शाहीर, डॉ. योगेश पवार हजर होते. 

यावेळी आर्या फौंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी फोन करून हुतात्मा जवान केशवच्या वडिलांची विचारपूस करून त्यांचे सांत्वन केले. कुटुंबात केवळ वडील आणि हुतात्मा जवानाची पत्नी असून ३ दिवसापूर्वीच हुतात्मा जवान यांच्या पत्नीला कन्यारत्न प्राप्त झाले. वडील डाव्या हाताने अपंग असून, गावातील मंदिराची साफसफाई करून गावकरी देत असलेल्या अन्नधान्यावर उदरनिर्वाह करतात. त्यात एकुलता एक मुलगा ही देशासाठी हुतात्मा झाला.
आधिही राज्यातील ठिकठिकाणच्या १० शहीदांच्या कुटुंबियांना आर्या फौंडेशनच्या वतिने मदत करण्यात आली आहे.

या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना यानी केली मदत
संदीप सोमनाथ ठोक (खंडागळी, ता.जि. नाशिक), विकास कुळमेथे (नेरळ,ता.वणी, जि. यवतमाळ), विकास उईके (नांदगाव खंडेश्वर,ता.जि. अमरावती), चंद्रकांत गलांडे(जाशी, ता.माण, जि. सातारा), नितीन सुभाष कोळी (दुधगाव,ता.मिरज,जि. सांगली), सुमेध वामन गवई (लोणाग्रा,ता.जि.अकोला), रवींद्र धनावडे(मोहट मेळा, ता.जि. सातारा), मिलिंद किशोर खैरनार, (नंदुरबार,रा.म्हसरूळ, नाशिक), योगेश मुरलीधर भदाणे (खलाने ता.शिंदखेडा जि. धुळे), कौस्थुभ प्रकाश राणे (मिरा रोड मुंबई)

आवाहनाला दात्यांचा प्रतिसाद
हुतात्मा झालेल्या जवानांची भर निघू शकत नाही मात्र त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळावा म्हणून डॉ. धर्मेंद्र पाटील हे हुतात्मा जवानाचे छायाचित्र व मदतीविषयीचा संदेश सोशल मीडिया वर पाठवितात त्यानुसार त्याला प्रतिसाद देत जळगाव शहरातून च नव्हे तर राज्यातून व परदेशातून ही दाते सढळ हाताने मदत करीत असल्याचा सुखद अनुभव संस्थेला येत असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.

स्वखर्चाने राज्याच्या कानाकोपऱ्यात मदतीसाठी पोहचतात संस्थेचे पदाधिकारी राज्यात आतापर्यंत नाशिक,अमरावती, यवतमाळ, अकोला, सातारा, सांगली, नंदुरबार, शिंदखेडा, मुंबई, धुळे इत्यादी ठिकाणच्या हुतात्मा कुटुंबियांच्या घरी आर्या फौंडेशन चे पदाधिकारी हे स्वखर्चाने मदतीसाठी पोहचतात ही विशेष बाब आहे.

"देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आधार मिळावा व सीमेवरील जवानांचा हुरूप वाढावा या उद्धेशाने आपण ही मदत करीत असतो."
- डॉ.धर्मेंद्र पाटील, अध्यक्ष, आर्या फौंडेशन, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT