Gulabrao-Wagh
Gulabrao-Wagh 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव लोकसभेत शिवसेना भाजपच्या पुढे

सकाळवृत्तसेवा

जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना प्रचारात आता भारतीय जनता पक्षाच्याही पुढे निघून गेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात स्वबळावर लढण्यास आम्ही सक्षम आहोतच, पण युती झाली तरीही आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही, असे मत जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

शिवसेनेने लोकसभा स्वबळावर लढविण्याची तयारी पूर्ण केली आहे. पाचोऱ्याचे माजी आमदार आर. ओ. (तात्या) पाटील व स्वत: आपणही इच्छुक उमेदवार आहोत. पक्षातर्फे ज्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल. ते उमेदवार असतील. मात्र, आम्ही संयुक्तपणे प्रचार करीत आहोत. या मतदार संघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. जळगाव ग्रामीण, पाचोरा येथे आमचे आमदार आहेत.

जळगाव शहरात सुरेशदादा जैन यांची ताकद आहे. एरंडोल येथे माजी आमदार चिमणराव पाटील यांचे कार्य तसेच ताकदही आहे. भडगावला आमच्या पक्षाच्या नगराध्यक्ष आहे. अमळनेर व चाळीसगाव या ठिकाणीही आम्ही जोर लावत आहोत. आम्ही लोकसभा मतदार संघातील सर्व तालुक्‍यात व गावात आम्ही प्रचार केला आहे. आता पारोळ्यात प्रचाराचा अंतिम टप्पा आहे. धनुष्यबाणाचे चिन्ह आम्ही घराघरांत पोहोचविले आहे. त्यामुळे भाजपसह विरोधकांचा उमेदवार कोणीही असला तरी आम्ही त्यांचा पराभव करणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT