उत्तर महाराष्ट्र

अवैध वाळू उपसा बेतला जिवावर 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : मोहाडी परिसरातील नागझिरी शिवारात रेल्वे पुलाचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी असलेल्या खड्डयात नाझगिरी शिवारातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्‍टर पडल्याची घटना घडली. या अपघातात ट्रॅक्‍टरचालक विनोद महारु मालचे (वय 36, रा. मोहाडी) याचा मृत्यू झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसदलाने सावखेडा, नागझिरी शिवारात वाळू चोरट्यांवर कारवाई केली, त्या कारवाईपूर्वीच मालकाने चालक विनोदला "तू जिथं असशील तिथून ट्रॅक्‍टर घेऊन परत ये..असा फोन केल्यानंतर ट्रॅक्‍टर पळविण्याच्या नादात ट्रॅक्‍टरसह खोल खड्ड्यात पडल्याने ट्रॅक्‍टरखाली चिरडला गेला. 

गेल्या 10 ते 15 वर्षांपासून विनोद मालचे हा वाळूच्या ट्रॅक्‍टरवर चालक म्हणून काम करत होता. नेहमीप्रमाणे आज ते मेहरुण येथील मालकाच्या ट्रॅक्‍टरवर चालक म्हणून गेले होते. नागझिरी पाणवठा या ठिकाणी गिरणा नदीपात्रात वाळू भरण्यासाठी ट्रॅक्‍टर घेऊन गेले. या ठिकाणी कामगारांनी ट्रॅक्‍टरमध्ये वाळू भरली. यानंतर हे ट्रॅक्‍टर घेऊन चालक विनोद मालचे हे जळगावकडे येते होते. रस्त्यातच रेल्वेलाईन शेजारी पुलाचे काम सुरू असल्याने याठिकाणी कामासाठी खड्डा करण्यात आला होता. मालक यांचा सावखेडा शिवारात कारवाई झाल्याचा फोन आला. कारवाईच्या भीतीने वेगाने ट्रॅक्‍टर घेऊन जात असताना खड्डयाचा अंदाज न आल्याने चालक मालचे यांनी अचानक ब्रेक दाबला आणि त्यांचे ट्रॅक्‍टर खड्डयात कोसळले. रेल्वेच्या कामगारांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच मोहाडी ग्रामस्थांना प्रकार कळविला. यानंतर मृत चालक विनोद मालचे असल्याचे निष्पन्न झाले. विनोद यांच्या पश्‍चात पत्नी ललिता, एक मुलगी दिव्या, आई विमलबाई व वडील महारू पांडुरंग मालचे असा परिवार आहे. 

अन्‌ अंदाज चुकला.. 
मालकाचा फोन आल्याने विनोद नागझिरीच्या लवण परिसरातून ट्रॅक्‍टर सुसाट पळवत सुटला. वाटेत रेल्वेचे काम सुरू असल्याने येथे वेगवान ट्रॅक्‍टर त्याच्याकडून नियंत्रित न झाल्याने तो ट्रॅक्‍टरसह वीस फूट खोल खड्ड्यात कोसळला. ट्रॅक्‍टरखाली दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बाराला हा अपघात घडला आणि एकच्या सुमारास नदीपात्रात कारवाईला सुरवात झाली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT