mnpa election foom
mnpa election foom  
उत्तर महाराष्ट्र

जळगाव मनपा पोटनिवडणूकीत भाजप महाविकास आघाडी सोबत 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव: मनपा पोटनिवडणूकीत भाजप महाविकास आघाडी सोबत जळगावः राज्यात निवडणूकीनंतर भाजप शिवसेना कट्टर विरोधक झाले आहे. परंतू जळगाव महापालिकेच्या प्रभाग 19 "अ' च्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपाने देखील पाठींबा दिला आहे. आज महापालिकेत शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी, कॉग्रेस व भाजपच्या पदाधिकारी देखील उपस्थित होते. 

जळगाव महानगरपालिकेच्या 2018 सार्वत्रीक निवडणूकीत प्रभाक क्रमांक 19 "अ' मधून नगरसेविका म्हणून लता सोनवणे या निवडणून आल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत चोपडा विधानसभा मतदार संघातून लता सोनवणे या निवडणुकीत विजय झाल्याने त्यांनी नगरसेविका पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे 19 "अ' मधील रिक्त जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी शिवसेनातर्फे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या भगिनी निता मंगलसिंग सोनवणे यांचा तर अपक्ष म्हणुन आशा किशोर कोळी यांचा अर्ज दाखल झाला आहे. 

सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची उपस्थीत 
शिवसेनेतर्फे निता सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार लता चंद्रकांत सोनवणे, विरोधीपक्षनेते सुनील महाजन, गटनेते अनंत जोशी, अण्णा भापसे, नगरसेवक गणेश सोनवणे, माजी महापौर राखी सोनवणे, भाजपाचे उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, गटनेते भगत बालाणी, उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील, विशाल त्रिपाठी, कॉग्रेसचे देवेंद्र पाटील, श्‍याम तायडे, जाकीर बागवान, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, रोहन सोनणे, मंगलसिंग सोनवणे आदी उपस्थित होते. 

सत्ताधारी भाजपने दिला नाही उमेदवार 
राज्यात एकमेकांवर शिवसेना व भाजप सडकून टिका केल्या जात आहे. मात्र जळगाव महपालिकेच्या प्रभाग 19 "अ'च्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीसोबत सत्ताधारी भाजपने उमेदवार न देता हातमिळवणी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT