उत्तर महाराष्ट्र

तिने उडी घेताच...अंगावर आले शहारे 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव: शहरातील रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 च्या अपलाईनवर आज थरारक घटना घडली. पूजा विनोदकुमार बजाज (वय-40, टी.एम.नगर, रा. सम्राट कॉलनी) या महिलेने समोरून रेल्वे येताच तीने रेल्वे समोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना दुपारी घडली. या घटना घडली तेव्हा रेवे स्थानकावरील असलेल्या नागरिकांचा अंगावर शहारे उभे राहिले. 

सम्राट कॉलनी परिसरातील पूजा बजाज यांचे पतीचे 12 वर्षापूर्वी निधन झाले आहे. चार महिन्यांपासून पूजा 
ह्या त्यांच्या बहिणीकडे अमरावती येथे राहत होत्या. आज सकाळी वर्धा येथून त्या जळगावला आल्या. येथे 
आल्यानंतर त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 येथे रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. स्टेशन प्रबंधक पारधी यांनी याबाबत लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. त्यानुसर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सिध्दार्थ इंगळे, पोलिस कर्मचारी अजय बर्वे, योगेश चौधरी, अजय मून यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी महिलेजवळील मोबाईल मिळून आला. त्यातील मोबाईल पूजा यांचे दीर मनोज रोशनलाल बजाज यांच्या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांनी घटनेची माहिती दिली. त्यानुसार मनोज बजाज यांनी घटनास्थळ गाठल्यावर मृतदेह पाहिल्यावर त्यांनी ओळख पटवली. . यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 
पूजा बजाज हिच्याजवळ प्लास्टिकची पिशवी, पर्स, दोन मोबाईल, चार्जर, शाल, अंगावरील कपडे, पेन, व काही रोख रक्कम असे साहित्य मिळून आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. पूजा यांच्या पश्‍चात मुलगा साहिल, मुलगी संजना असा परिवार आहे. साहिल हा नागूपर येथे तर संजना नाशिक येथे नोकरी करत असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT