उत्तर महाराष्ट्र

चालकाला मारून कार पळविण्याचा प्रयत्न फसला

सकाळवृत्तसेवा

जळगाव - शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाजवळ पार्किंगमध्ये चालकासोबत उभी असलेली मारुती ओमनी कार पळविण्याचा दोघा चोरट्यांचा प्रयत्न रात्री फसला. रात्री साडेदहाला चालकास बेदम मारहाण करून दोघे चोर कार न नेण्याच्या तयारीत असताना महिलांनी आरडाओरड केल्याने लग्नात आलेल्या वऱ्हाडींसह परिसरातून ये-जा करणाऱ्यांनी कारमध्येच एकाला पकडून चोप दिला. संतप्त जमावाच्या तावडीतून सोडवून काहींनी चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. 

शहरातील जैनाबाद, कांचननगर परिसरातील रहिवासी मोहन रामदास सोनवणे यांच्या भावाचे लग्न नूतन मराठा महाविद्यालयात होते. गोरज मुहूर्ताची वेळ असल्याने रात्री उशिरा कुटुंबातील महिला, लहान मुले आणि पाहुण्यांना घरी पोचविण्यासाठी सोनवणे कुटुंबीयांनी तीन ते चार वाहने बाहेर ठेवली होती. त्यात राजेंद्र हरी कोळी (वय ६०) हे वयोवृद्ध चालक पाहुण्यांच्या प्रतीक्षेत त्यांच्या ताब्यातील मारुती ओमिनी व्हॅनमध्ये (एमएच १९, अेबी ६१३४) चालक आसनावर बसलेले होते. यावेळी आडदांड शरिरयष्टीचे दोन तरुण त्यांच्याकडे आले व दार उघडण्यास सांगत दोघांनी मारहाण करण्यास सुरवात केली. एकाने गाडीतून बाहेर ओढत दुसऱ्याने कोळी यांच्या खिशातील चावी, साडेआठशे रुपये मोबाईल हिसकावून व्हॅन सुरू करून पळण्याच्या तयारी असतानाच गाडीजवळ आलेल्या महिलांनी चालकाला मारहाण होत असल्याचे पाहून आरडाओरड केला. वऱ्हाडींसह रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनी थांबून सुरू असलेल्या कारमध्येच चोरट्याला रंगेहाथ पकडून बेदम मारहाण केली. दोन तीनशेच्या जमावाने या चोरट्याला मिळेल, तसे झोडपून काढले. याच वेळी राहुल जोशी महेश चिंचोले, मनोज टेकावडे यांनी संतप्त जमावाच्या तावडीतून त्याला सोडवून शहर पोलिस ठाणे गाठले. मागोमाग मोहन सोनवणे चालक राजेंद्र कोळी आणि वऱ्हाडीही पोलिस ठाण्यात धडकले. चालकासह पकडून आणलेल्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: महायुतीचे उमेदवार पियुष गोयल उद्या उमेदवारी अर्ज भरणार

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT