उत्तर महाराष्ट्र

चित्रकलेच्या परीक्षेतही अजब फतवा 

सकाळवृत्तसेवा

जळगाव - दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांची सवलत देणारी एलिमेंटरी परीक्षा दिली असेल, तरच इंटरमिजिएट परीक्षेचे गुण मिळतील, असा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे. चित्रकलेची ही परीक्षा झाल्यानंतर शिक्षण विभागाने काढलेल्या या अजब "फतव्या'ने राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. शिवाय, या निर्णयाद्वारे शासनाने या परीक्षेचे गुणही कमी केले आहेत. 

शासनाला हा निर्णय घ्यायचाच होता, तर तो परीक्षा होण्याआधीच घ्यायचा होता. या परीक्षेची तयारी करून ती दिल्यानंतर एलिमेंटरी परीक्षेचे बंधन घालण्याचा "विनोद' शिक्षण विभागाला कसा सुचला, असा प्रश्‍नही या निर्णयाच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातून उपस्थित होत आहे. 

अशी होती गुणांची सवलत 
कलेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने शासनाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलेतील विविध शाखांसाठीच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेतील अतिरिक्त गुण देण्याची सवलत सुरू केली होती. यात रेखाकला (चित्रकला) प्रकारात एलिमेंटरी (पहिली) व इंटरमिजिएट (दुसरी) परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतून विद्यार्थ्यांना ए ग्रेडसाठी 15, बी ग्रेडसाठी 10 व सी ग्रेडसाठी 5 गुण प्रोत्साहनपर दिले जायचे. या आधीच्या निर्णयानुसार चित्रकलेसाठी इंटरमिजिएट परीक्षा दिली, तरी हे गुण मिळायचे, त्यासाठी एलिमेंटरी परीक्षेचे बंधन नव्हते. यंदा या दोन्ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात 24, 25 व 25, 26 तारखेला झाल्या. मात्र, शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 24 नोव्हेंबरला नवा आदेश जारी करून प्रोत्साहनपर देण्यात येणारे गुण ए ग्रेडसाठी 10, बी ग्रेडसाठी 7 व सी ग्रेडसाठी 5 असे कमी केले. शिवाय, एलिमेंटरी परीक्षा दिली असेल, तरच इंटरमिजिएटचे गुण मिळतील असेही बंधन घातले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT