leopard
leopard 
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या दिवाळीवर बिबट्याचे संकट!

शिवनंदन बाविस्कर

पिलखोड (ता. चाळीसगाव) : बिबट्याचे हल्ले थांबून पंधरवडा होत नाही, तोच पुन्हा त्याने पशुसंहार सुरु केला आहे. येथील चाळीसगाव रस्त्यावरील शेतात बिबट्याने काल(ता. 19) रात्रीच्या सुमारास वासराचा फडशा पाडला. यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर नुकसानीचे संकट ओढवले आहे. 

नर व पशुसंहार करणाऱ्या बिबट्याने आपला मोर्चा पुन्हा पिलखोडकडे वळविला आहे. येथील चाळीसगाव रस्त्यालगत भास्कर नथु माळी यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात नेहमीप्रमाणे गुरे बांधली होती. रात्रीच्या सुमारास गायीजवळ बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. यात बिबट्याने वासराचा नरडा फोडला. शिवाय मानेचा संपुर्ण भाग खाल्ला. तसेच वासराला बांधलेल्या खुट्यासह काही अंतरावर ओढुन नेले होते.

सकाळी भास्कर माळी यांचे भाऊ शेतात आले असता, त्यांना हा प्रकार दिसला. या घटनेची माहिती त्यांनी वन विभागाला दिल्यानंतर वन कर्मचारी शेतात आले. त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, हल्ला झालेल्या शेतात व पिंपळवाड म्हाळसा शिवारात प्रत्येकी एक पिंजरा लावण्यात आल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली.

ग्रामस्थांना खोटे ठरवले....
अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याच्या हल्ले व चर्चा थांबल्या होत्या. मात्र, दोन दिवसांपासून पिलखोड शिवारात शेतकऱ्यांंना व शेतमजुरांना बिबट्या दिसत होता. ग्रामस्थांनी वन कर्मचाऱ्यांना बिबट्या पाहिल्याचे सांगितले देखील होते. मात्र, वन विभागाने ग्रामस्थांना खोटे ठरवत परिसरात बिबट्या नसल्याचे सांगितले. परंतु कालच्या घडलेल्या घटनेमुळे पुन्हा बिबट्या शिवारात ठाण मांडुन असल्याचे सिद्ध झाले. 

वन विभागाचा कारवाईचा देखावा...
परिसरात सहा पिंजरे लावुन दोन 'शार्पशुटरां'ना पाचरण करूनही नर व पशुसंहार करणारा बिबट्या वन विभागाच्या हातात सापडला नाही. हल्ले होत असतांना निव्वळ ग्रामस्थांसमोर कार्यवाही करण्याचा देखावा वन विभाग करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अजुन किती हल्ले होण्याची वाट प्रशासन बघत आहे, असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

शेतकरी सापडले दुहेरी संकटात
अगोदरच सततच्या पावसाने कापुस खराब झाला आहे. त्यात बिबट्याच्या भितीने शेतात मजूर जाण्यास नकार देत आहेत. शिवाय हवामान खात्याने नुकतेच पावसाचे अंदाज वर्तविल्याने कापसाचे पुन्हा नुकसान होईल असे दिसत आहे. यामुळे शेतकरी बिबट्या आणि नैसर्गिक अशा दुहेरी संकटात सापडले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT