उत्तर महाराष्ट्र

नऊ दुकाने फोडली अन्‌ गल्ल्यात दहा रूपये टाकले 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : एखाद्या भीक मागणाऱ्याला आठाण्या सारखे कमी किमतीचे नाणे दिले तर, तो ज्या पद्धतीने फेकून देतो, त्याच पद्धतीने एका मागून एक चक्क नऊ दुकाने आणि कार्यालये फोडूनही चोरट्यांच्या हातात काहीच लागले नाही. चोरीचा प्रयत्न फसल्याने अखेर चोरट्यांनी शेवटच्या केकच्या दुकानात चक्‍क दहा रुपये टाकून निघून गेल्याचे आढळले. गेल्याच आठवड्यात चार दुकाने फुटली असताना आता झालेला प्रकार पाहता दुकानदारांमध्ये या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शहरातील गणेश कॉलनी रोडवर ख्वॉजामिया दर्ग्याजवळच युनिटी चेंबर्समध्ये मेजर कॉर्नर या बिल्डिंगमध्ये काही दुकानांमध्ये ऑफिस तर काही दुकानांमध्ये फोटोग्राफरचे दुकान आहे. व्होडाफोन ऑफिस शेजारी "एल.जी.' कंपनीचे कार्यालय, त्याच्या बाजूला हरिविठ्ठल नगरातील रहिवासी दीपक राठोड याचे आर.ओ.चे कार्यालय, शेजारी पोलिस कर्मचारी मिलिंद केदार यांचे ऑफिस असून ऑफिसात फर्निचरचे काम सुरू आहे. केदार यांच्या बाजूला पिंप्राळा परिसरातील श्‍याम कासार यांचे मयूरी फोटो स्टुडिओ आहे. एल.जी. या दुकानाच्या दोन्ही बाजूचे कुलूप तोडून प्रवेश केला. मात्र याठिकाणी केवळ कागदपत्रे आढळली. या व्यतिरिक्त सर्व दुकानांमध्ये चोरट्यांनी शटर वाकवून तसेच कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र हाती काहीच लागले नाही. 

चोरट्याने टाकले गल्ल्यात पैसे 
युनिटी चेंबरमधील दुकाने, कार्यालयानंतरही चोरट्यांनी ख्वॉजामियाच्या दर्ग्याच्या विरुद्ध बाजूने रस्त्यालगतचे सनील सदानंद किझुमविल यांच्या मालकीचे भाडेकरारावर "बडीज्‌ केक शॉप' लक्ष्य केले. दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. या ठिकाणीही गल्ल्यात चोरट्यांना कुठलीही रोकड हाती लागली नाही. नऊ दुकानांमध्ये प्रयत्न करूनही कुठलीही रक्कम हाती न लागल्याने चोरट्यांनीच दुकानातील रिकाम्या गल्ल्यात स्वतः हून दहा रुपये टाकून पोबारा केला. दुकानात काचेच्या कपाटांमध्ये केकही होते, मात्र चोरट्यांनी कुठल्याही वस्तूला हात लावला नसल्याचेही दुकान मालकाने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT