उत्तर महाराष्ट्र

नोकरी सुटली अन्‌ झाला चोर 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः वाशिम येथील अपंगांच्या शाळेत शासकीय नोकरीत असलेल्या शिवाजी राठोड यास नोकरीवरून काढून टाकले गेल्याने त्याने वाहनचोरीचा उद्योग सुरू केला. सत्तर हजारांची दुचाकी दहा-बारा हजारांना विकत असल्याने संशयावरून वाशिम गुन्हे शाखेने त्यास अटक केली. अटकेनंतर राठोडने एकापाठोपाठ एक अशा 17 दुचाकी जळगाव शहरातून चोरल्याचे कबूल केले असून, गोलाणी व्यापारी संकुल परिसरातून लांबविलेल्या सहा दुचाकी त्याने काढून दिल्या. 

भुसावळमधील जामनेर रोडवरील रहिवासी सुरेश रघुनाथ पाटील (वय 54) 6 ऑगस्ट 2018 ला गोलाणी व्यापारी संकुलात खासगी कामासाठी आले होते. यावेळी त्यांची गोलाणी व्यापारी संकुल परिसरातील हनुमान मंदिराजवळून तीस हजार रुपये किमतीची (एमएच 19- बीपी 4390) दुचाकी चोरीस 
गेल्याचे समोर आले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शोधपथकातील गणेश शिरसाळे हा तपास करीत आहेत. शिरसाळे यांना वाशिम येथे दुचाकीचोरांना ताब्यात घेतले असून, त्यांनी चोरलेल्या सतरापैकी सहा दुचाकी जळगावातून चोरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गणेश शिरसाळे, प्रनेश ठाकूर, नीलेश पाटील, भास्कर ठाकरे यांच्या पथकाने वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यातून राठोड यास ताब्यात घेतले. त्यानंतर चोरटा राठोडला दुचाकींसह घेऊन पथक मंगळवारी सकाळी जळगावात दाखल झाले. राठोडने त्याच्या साथीदारांसह शहरातील इतर ठिकाणांहूनही सहा दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली आहे. 

शासकीय नोकर झाला चोर 
वाशिम येथील अपंगांच्या शासकीय शाळेत कायम कर्मचारी असलेला शिवाजी राठोड याचा दुचाकीवरून अपघात झाला होता. त्यात त्याच्या पायाला मोठी दुखापत होऊन अनेक दिवस तो शाळेत गैरहजर राहिला. उपचारानंतरही हजर होत नाही म्हणून त्याला कामावरून कमी करण्यात आले. कामधंदा नाही, गुजराण करण्याचे दुसरे साधनही नाही म्हणून त्याने दुचाकीचोरीचा मार्ग पत्करला. जळगावातून दुचाकी चोरून ती वाशिम येथे दहा-बारा हजारांत विक्री करीत असल्याचे त्याने तपासात सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT