Tab
Tab 
उत्तर महाराष्ट्र

राज्यभरातील ग्रामीण शिबिरांमध्ये आता लायसन्ससाठी टॅबद्वारे परीक्षा

सकाळवृत्तसेवा

नाशिक - राज्यभरातील बहुतांश प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून तालुका पातळीवरील शिबिरांमध्ये लर्निंग लायसन्ससाठी तोंडी परीक्षा घेतली जाते. मात्र, यापुढील काळात ही परीक्षा मोबाईल-टॅबलेटद्वारे घेतली जाणार आहे. परिवहन आयुक्‍त कार्यालयाने पाचशे टॅब खरेदी केले असून, आरटीओ कार्यालयांपर्यंत पोचविले आहेत. 2016 मध्ये राबविलेला हा नाशिक पॅटर्न राज्यभरात राबविला जातो आहे.

दुर्गम ग्रामीण भागामध्ये विद्युत पुरवठा, इंटरनेट सुविधेपासून अन्य विविध कारणांमुळे ऑनलाइन लर्निंग यंत्रणा कार्यान्वित होत नव्हती. अशा स्थितीत ग्रामीण भागात होणाऱ्या तालुकास्तरीय शिबिरांमध्ये तोंडी परीक्षा घेऊन लर्निंग लायसन्स दिले जात होते. मात्र, या पद्धतीत परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 1 जुलै 2016 पासून टॅबलेटद्वारे ऑनलाइन परीक्षा घेऊन त्याआधारे लर्निंग लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरू केली. याची अंमलबजावणी आता राज्यपातळीवरील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये होणार आहे.

दरम्यान, यापूर्वी 2003 मध्ये राज्यात सर्वप्रथम नाशिक आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्ससाठी संगणकाद्वारे चाचणी घेण्याचा प्रयत्न झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT