voting
voting 
उत्तर महाराष्ट्र

Loksabha 2019 : ...अन्‌ मृत व्यक्ती मतदानासाठी अवतरल्या

युनूस शेख

जुने नाशिक - निवडणुकीपूर्वी जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून मतदारयाद्या तयार केल्या होत्या. मात्र हे काम अतिशय निष्काळजीपणाने झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. जुने नाशिक येथील एका केंद्रावर मतदारयादीत मृत दाखविलेले दोन मतदार चक्क मतदानासाठी अवतरल्याने केंद्रप्रमुखही आश्‍चर्यचकित झाले. 

जुने नाशिकमधील एक महिला आणि एक पुरुष अशी दोघांची नावे मतदारयादीत होती. परंतु त्यांच्या नावापुढे ते मृत असल्याचे दर्शविण्यात आले. सोमवारी (ता.२९) दोघे मतदार एका केंद्रात प्रगटले. त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्याच्या प्रयत्न केला असता केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्यांना मतदान करण्यास मज्जाव केला. केंद्रप्रमुखांनी दोघांची माहिती घेऊन संपूर्ण शहानिशा करून लेखी प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आणि त्यांना मतदानास परवानगी दिली.

दुसऱ्या प्रकारात एक उच्चशिक्षित व्यक्ती जुने नाशिक परिसरात वास्तव्यास आहे. कित्येक दिवसांत बाहेरही गेला नाही, असे असताना त्यांच्या नावापुढे टपाल मतदान केल्याचे दर्शविण्यात आले. मतदानाच्या दिवशी ते स्वतः मतदान करण्यास गेले असता केंद्रप्रमुखांनी मतदान केल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे काही केंद्रांमध्ये एका नावाच्या दोन व्यक्ती मतदानास अवतरल्याचा प्रकार घडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT