Crime-Scene
Crime-Scene 
उत्तर महाराष्ट्र

पंचवीस लाखांच्या लॉटरीसाठी तीन लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - ‘कौन बनेगा करोडपती’तून बोलत असून, २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याची बतावणी केली आणि लॉटरीची रक्कम मिळविण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी तब्बल २ लाख ८६ हजार रुपयांची रक्‍कम उकळून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

महिलेच्या तक्रारीनुसार, त्यांना गेल्या ७ जुलै रोजी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर ००१२८९२७२१११० या क्रमांकावरून दूरध्वनी आला. संशयिताने ‘कौन बनेगा करोडपती से बात कर रहा हूँ, बधाई हो, आपको २५ लाख रुपयोंकी लॉटरी लगी है’ असे सांगितले. लॉटरीचे पैसे पाहिजे असल्यास त्यासाठी रजिस्ट्रेशन फी १६ हजार ५०० रुपये भरावे लागतील. अरुण कुमार नाव असलेल्या या खात्यावर पीडितेने ही रक्कम ऑनलाइन जमा केली. त्यानंतही मागणीनुसार पीडित महिलेने ५०० रुपये, ७९ हजार ५०० रुपये, १ लाख ९० हजार रुपये असे एकूण २ लाख ८६ हजार ५०० रुपये जमा केले. मात्र त्यानंतरही संशयितांकडून पैशांची मागणी होत असल्याने त्यांना संशय आल्याने त्यांनी तक्रार दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT