A veterinary officer vaccinating animals against lumpy disease at a veterinary hospital here. Neighbor officials, villagers.
A veterinary officer vaccinating animals against lumpy disease at a veterinary hospital here. Neighbor officials, villagers. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : लम्पी आजारावर लसीची मात्रा; शेतकऱ्यांना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

नेर (जि. धुळे) : मागील दोन वर्षांपासून जनावरांवर लम्पी आजाराचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी वेळीच उपाययोजना करण्यासाठी सोमवारी (ता.१२) जनावरांवर नेर येथील पशुवैद्य रुग्णालयात लसीकरण करण्याचे काम वेगाने सुरु आहे. (Lumpy disease vaccine dosage Appeal to farmers to get vaccinated nashik Latest Marathi News)

धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच धुळे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा नेर जि.प. गटाचे सदस्य आनंद पाटील यांच्या प्रयत्नाने नेर जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये जनावरांवरील लम्पी आजारावर प्रतिबंधात्मक उपचारार्थ मोफत पशुवैद्यकीय शिबिर घेण्यात येत आहे.

यात प्राण्यांवरील लम्पी आजारावर प्रतिबंधात्मक लसीकरण गर्भ तपासणी, वंधत्व तपासणी, तसेच इतर विविध तपासण्या करण्यात आल्या. नेर गाव हे दुग्धव्यवसाय, शेतीप्रधान गाव असल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी दररोज येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात आपल्या प्राण्यांना लसीकरण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची वर्दळ होत असते.

नेर गावासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात महात्मा फुले चौक येथे सोमवारी (ता.१२) शिबिर घेण्यात आले. शुक्रवारी (ता. १६) भदाणे, मंगळवारी (ता.२०) अकलाड, शिरधाणे प्र.नेर बुधवारी (ता.२१) खंडलाय येथे शिबिर होईल.

या प्रसंगी येथील पं. स. पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत निकम, नेर येथील पशुधन विकास अधिकारी एस. ए. हिरे, नेर गटाचे जि. प. सदस्य आनंद पाटील, पशुधन पर्यवेक्षक मुश्ताक शेख, रईस शेख, पशुधन पर्यवेक्षक खंडलाय एम. बी. चौधरी, मोहन भागवत, चंद्रशेखर वसावे, प्रमोद सैंदाणे, दिग्विजय पाटील, बी. आर. बोरसे, माजी ग्रा. पं. सदस्य मोहन बोडरे, देविदास माळी, सुनील भागवत, आसाराम जाधव, मांगू मोरे आदी उपस्थित होते.

लम्पी आजारावर उपाययोजना

जनावरांच्या शरीरावर पुरळ दिसून आल्यास त्या प्राण्याला इतर प्राण्यांपासून वेगळे बांधावे. तसेच चाऱ्याचे वैरण वेगळे ठेवावे. लम्पी आजार बाधित जनावरांच्या जागेवर इतर प्राणी बांधू नये. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्राण्यांना जीवही गमवावा लागतो.

शेतकऱ्यांनी पाळीव प्राणी नियमित बांधून ठेवलेल्या जागी बुटॅक्स औषधाची फवारणी करावी. यामुळे जमिनीवरील विषाणूंचा नायनाट होईल. या सर्व उपाय योजनांची शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT