India vs Pakistan Asia Cup clash
esakal
Cricket
India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?
India vs Pakistan Asia Cup Head-to-Head Records and Key Stats | भारत-पाकिस्तान आशिया कपमध्ये 18 वेळा भिडले. भारताने 10, पाकिस्तानने 6 सामने जिंकले. कोण ठरेल विजेता? आकडेवारी आणि रेकॉर्ड जाणून घ्या.
रविवारी (14 सप्टेंबर) दुबईत आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन बलाढ्य क्रिकेट संघांमध्ये रोमहर्षक सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी आपल्या पहिल्या सामन्यांत विजय मिळवत जोरदार सुरुवात केली आहे. भारताने युएईला 9 गडी राखून पराभूत केले, तर पाकिस्तानने ओमानवर 93 धावांनी मात केली. सध्या भारत गुणतक्त्यात अव्वल स्थानावर आहे, तर पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे, कारण भारत-पाकिस्तान लढत ही नेहमीच क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी लढाई मानली जाते.

