Mahanagri Express will stop at Nandgaon The passengers demand is finally settled
Mahanagri Express will stop at Nandgaon The passengers demand is finally settled 
उत्तर महाराष्ट्र

महानगरी एक्स्प्रेस नांदगावला थांबणार ; प्रवाशांची मागणी अखेर मार्गी

सकाळवृत्तसेवा

नांदगाव : येत्या सहा सप्टेंबरपासून वाराणसी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान धावणारी महानगरी एक्स्प्रेस नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. सुरवातीला सहा महिन्यांसाठी हा थांबा प्रायोगिक तत्वावर मंजूर झाला. सकाळी सहा वाजेपासून अकरादरम्यान मुंबई नाशिककडे जाण्यासाठी एकही गाडी नसल्याने महानगरीचा थांबा मिळण्याची गेल्या दहा वर्षांपासूनची प्रवाशांची दीर्घकालीन मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली.

खासदार हरिश्चंद्र चव्हाण या मागणीचा रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. यापूर्वी गेली अनेक वर्षे कामयानी महानगरी व हुतात्मा एक्स्प्रेस या गाड्यांचे थांबे मंजूर करावेत. यासाठी रेल्वे कृती समितीचे निमंत्रक सुमित सोनावणे यांच्यासह विविध पातळीवर जनतेच्या मागणीचा रेटा होता. रेल्वे प्रशासनाने त्याकडे आर्थिक उत्पन्न मिळत नाही म्हणून दुर्लक्ष केले. कामयानी एक्स्प्रेससाठी तर रेल रोकोसारखे आंदोलने करण्यात आली होती. त्यामुळे २८ फेब्रुवारी २०१४ पासून कामयानी एक्स्प्रेस नांदगाव स्थानकावर थांबत आहे त्यांनतरच्या चार वर्षाच्या पाठपुराव्याला आत यश आले असून, येत्या सहा सप्टेंबरपासून नांदगावला महानगरी एक्स्प्रेसचा प्रायोगिक तत्वावरचा थांबा मंजूर झाला.

खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पाठपुरावा केल्याबद्दल प्रवाशी संघटनांनी खासदार चव्हाण यांचे आभार मानले व यापुढे आता पुणे भुसावळदरम्यान धावणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसला मंजुरीसाठी अधिक प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान, महानगरी एक्स्प्रेसचा मंजूर करण्यात आलेला थांबा प्रायोगिक तत्त्वावर असून, नांदगाव स्थानकातून या एक्स्प्रेस गाडीसाठी तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न बघून थांबा नियमित केला जाणार आहे. सहा सप्टेंबरपासून थांबणाऱ्या महानगरी एक्स्प्रेसच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. खासदार चव्हाण स्वतः हिरवा झेंडा दाखविणार असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी दिली 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT