उत्तर महाराष्ट्र

स्थायी समितीवर भाजपचेच बहुमत 

सकाळवृत्तसेवा

नाशिक - महापालिकेच्या आर्थिक नाडी असलेल्या स्थायी समितीवर तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्षांच्या प्रयत्नांना आज महापौर रंजना भानसी यांनी सुरुंग लावला. विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार सोळा सदस्यांची नावे त्यांनी जाहीर केली. या समितीत भाजपचे नऊ सदस्य नियुक्त झाल्याने सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. शिवसेनेचे चार, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रत्येकी एक, तर मनसेच्या एका सदस्याची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. 

समिती सदस्यांची नियुक्ती होण्यापूर्वी गटनेत्यांची बैठक झाली. त्या वेळी शिवसेनेने पाच सदस्यांचे पत्र दिले. रिपाइं व शिवसेनेची आघाडी असल्याने स्थायी समितीवर पाच सदस्य नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली. परंतु महापौरांनी मागणी फेटाळत थेट सभागृहात हजर झाल्या. कॉंग्रेसने गटनेत्यांची नव्याने नियुक्ती झाल्याने सदस्यांची नावे सुचविण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली. त्यानुसार दहा मिनिटे दिली. त्यानंतर समिती सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विरोधकांनी न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देऊन महापौरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याकडे दुर्लक्ष करत सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. नवनियुक्‍त सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

विरोधकांचा डाव फसला 
विभागीय आयुक्तांनी शिवसेना-रिपाइं एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळल्याने त्याविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केला. सुनावणीपूर्वीच महासभेत घोषणा होत असल्याने विरोधकांकडून नियुक्तीप्रक्रियेस विलंब लावण्याचे प्रयत्न सुरू होते, परंतु विरोधकांची चाल लक्षात येताच महापौर भानसी यांनी तातडीने घोषणा करून विरोधकांचा डाव उधळून लावला. शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी नियमबाह्य कामाला सुरवात करून भाजपने पारदर्शकतेचा चेहरा दाखविण्यास सुरवात केल्याचा आरोप या वेळी केला. 

स्थायी समितीचे सोळा शिलेदार 
ज्या भागातून अधिक नगरसेवक निवडून आले, त्यानुसार भाजपने स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती केली. त्यानुसार पंचवटी भागातील चार, पूर्व विभागातील तीन व पश्‍चिम विभागातील दोन नगरसेवकांना संधी दिली. निवडणुकीच्या तोंडावर मनसेतून भाजपत गेलेले शशिकांत जाधव, कॉंग्रेसमधून भाजपत गेलेले शिवाजी गांगुर्डे यांच्यासह नवनियुक्त नगरसेवक जगदीश पाटील, सुनीता पिंगळे, विशाल संगमनेरे, डॉ. सीमा ताजणे, मुकेश शहाणे, अलका अहिरे, ऍड. श्‍याम बडोदे यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेने पाच सदस्यांची नावे दिली होती. त्यांपैकी रिपाइंच्या दीक्षा लोंढे यांचे नाव वगळून प्रवीण तिदमे, भागवत आरोटे, डी. जी. सूर्यवंशी व सूर्यकांत लवटे यांची नियुक्ती करण्यात आली. मनसेकडून अपक्ष मुशीर सय्यद, कॉंग्रेसकडून वत्सला खैरे व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून राजेंद्र महाले यांची नियुक्ती करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT