police
police esakal
उत्तर महाराष्ट्र

गावठी पिस्तुलासह हरियाणाचा पंजाबी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

धुळे : मुंबई- आग्रा महामार्गावरील नरडाण्यालगत दभाशी शिवारात गुरुवारी हरियानाच्या तरुणाला पिस्टलसह ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) धुळे शहरात संशयित पंजाबीला गावठी पिस्टलसह गजाआड केले. त्याच्याकडून २६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शहरातील कोळवले नगरातील हृतिक ऊर्फ निक्की अमरसिंग पंजाबी (वय २२) याच्याकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. याअनुषंगाने त्यांनी एलसीबी पथकाला कारवाईची सूचना दिली. त्यानुसार निक्की पंजाबीचा शोध सुरु झाला. तो मोहाडी उपनगरातील दंडेवालेबाबा नगर परिसरात आढळला. गावठी कट्ट्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला एलसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले.

पोलिसी खाक्या दाखविताच पंजाबीने गावठी कट्ट्याची माहिती दिली. त्याने दंडेवालाबाबा नगरातील हुडको कॉलनी शेजारील नाल्यालगत पार्किंग यार्डच्या कंपाउंड वॉललगत दगडाखाली गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे लपविली होती. ती त्याने पोलिसांना काढून दिली. या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात पंजाबी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. संशयित निक्की पंजाबी याच्यावर पूर्वी देवपूर, मोहाडी, आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, हवालदार प्रभाकर बैसाणे, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, गुलाब पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT