corona negative
corona negative corona negative
उत्तर महाराष्ट्र

निगेटिव्ह रुग्णांचाही उपचाराचा मार्ग मोकळा

सकाळ डिजिटल टीम

धुळे : कोरोना संशयित किंवा निगेटिव्ह (Corona negative)अहवाल आलेल्या परंतु लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला जात होता. परिणामी, असे काही रुग्ण उपचाराअभावी दगावले किंवा ते ‘सुपर स्प्रेडर’ (Super spreder) झाले. आता अशा रुग्णांना कुठलीही सबब न देता उपचारासाठी दाखल करून घेण्याचा आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health ministry) दिला. तसेच रुग्णाला दाखल करून घेण्याबाबत अनेक अटी शिथिल केल्याची माहिती जागतिक वैद्यकीय संघटनेचे कोशाध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी दिली. (dhule news corona negative report admit patient)

कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणासाठी राज्यात १५ मेपर्यंत लॉकडाउन लागू आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, धुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या, मृत्युदर कमी होण्यास मदत झाली. लॉकडाउननंतर धुळे जिल्ह्यात सरासरी अडीचशे रुग्ण आढळत आहेत. ऐरवी ही संख्या पाचशे ते सहाशेच्या घरात होती. यासंदर्भात डॉ. वानखेडकर म्हणाले, की राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट सरासरी २२ टक्के असून, धुळे, पुणे, मुंबईचा दर सरासरी दहा टक्क्यांवर आला. ही हुरळून जाण्यासारखी स्थिती नाही. कोरोना नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करतच राहाव्या लागतील. यात केंद्राने रुग्णांवरील उपचाराबाबत अनेक अटी शिथिल केल्या. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल तरी टळतील.

केंद्रीय सूचना, सक्ती काय?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (ता. ८) रुग्णांच्या उपचाराबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्व लागू केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून झालेली कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल ही त्रिस्तरीय रचना कायम आहे. तीत अनुक्रमे सौम्य लक्षणे, ऑक्सिजनयुक्त बेड व देखरेख आणि आक्सिजनसह व्हेंटिलेटर, आयसीयूची गरज असलेल्या रुग्णांचा समावेश आहे.

तर दाखल करून घेणे बंधनकारक

केंद्राने आता रुग्णांवरील उपचारासाठी कोरोना पॉझिटिव्ह टेस्टचे बंधन काढले आहे. रुग्णाच्या स्थितीनुसार तो संशयित किंवा निगेटिव्ह अहवाल असेल, परंतु त्याच्यात कोरोनाची लक्षणे जाणवत असतील तर त्याला उपचारासाठी दाखल करून घेणे बंधनकारक केले आहे. अशा रुग्णांवरील उपचाराबाबत नकार देऊ नये. त्याला औषधी, ऑक्सिजन व इतर सोयीसुविधा पुरविणे बंधनकारक आहे. तसेच रुग्ण कुठलाही जिल्हा, शहरातील असला तरी त्याला आहे त्या ठिकाणच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेणे अनिवार्य आहे. यासंदर्भात रुग्णाकडे आधारकार्ड, वैध ओळखपत्र असो की नसो त्याला उपचार नाकारू नये. तसेच ‘व्हीआयपीं’नी गरज नसताना बेड बाळगला असेल, तर त्यांना घरी विलगीकरणात पाठविणे बंधनकारक असल्याचे निर्देश केंद्राने दिले.

लॉकडाउननंतर पुन्हा गर्दी, विवाह सोहळे, साखरपुडे, कोरोनाला निमंत्रण देणारी पावले पडली तर तिसऱ्या लाटेपासून आपल्याला कुणीही वाचवू शकणार नाही. त्यात लसीकरण महत्त्वाचे आहे. या मोहिमेचा वेग सरकारला वाढवावा लागेल. चाचण्यांची क्षमता व संख्या वाढवावी लागेल. धुळे जिल्ह्यात अडीच हजारांवरून चार हजारांवर चाचणी संख्या न्यावी लागेल.

-डॉ. रवी वानखेडकर, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, आयएमए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT