dhule janta curfew
dhule janta curfew 
उत्तर महाराष्ट्र

धुळेकरांनो ‘आज'ही असाच संयम ठेवा ! 

रमाकांत घोडराज

धुळे : शनिवार, रविवारच्या सुटीनंतर सोमवारी नोकरदार वर्गासह सर्वसामान्य नागरिकही घराबाहेर पडतो, आजचा सोमवार मात्र त्याला अपवाद ठरला. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळे रविवारी (ता.१४) सायंकाळी सहापासून जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू झाला. त्यामुळे काल सायंकाळपासून बंद झालेल्या शहरातील सर्व दुकानांचे शटर आज (ता.१५) सकाळीही बंदच राहिले. भाजीपाला, फळे यासह विविध वस्तू विक्रीसाठी हातगाड्यांवर तसेच रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या छोट्या विक्रेत्यांची जत्राही नसल्याने रस्ते सामसूम होते. त्यामुळे शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती वगळता जनता कर्फ्यूला शहरात पहिल्या दिवशी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. उद्या (ता.१६) ही धुळेकर असाच संयम ठेवतील अशी अपेक्षा आहे. 

कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात झपाट्याने वाढत असल्याने लोकप्रतिनिधी, व्यापारी, सामाजिक संघटना आदींशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभरात जनता कर्फ्यू घोषित केला. १४ मार्चच्या सायंकाळी सहा ते १७ मार्चच्या सकाळी सहा वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू आहे. त्यामुळे काल सायंकाळपासूनच धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ आग्रारोड, पाचकंदील, पारोळारोडसह सर्वच भागातील बाजारपेठेत शुकशुकाट झाला होता. दरम्यान, जनता कर्फ्यूची खरी कसोटी आज (ता.१५) सकाळपासून होती. या कसोटीवरही धुळेकर खरे उतरल्याचे पाहायला मिळाले. जनता कर्फ्यूमुळे अत्यावश्‍यक सेवा व शासकीय कार्यालयांमधील कामकाज वगळता साधारण सर्वच व्यवहारांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूत सहभाग नोंदवून कोरोना संसर्गाची साखळी तोडावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत धुळेकरांनी घरातच बसणे पसंत केले. 

किरकोळ उपस्थिती 
जनता कर्फ्यूदरम्यान, दूध खरेदी-विक्री केंद्रांना सकाळी पाच ते नऊ आणि सायंकाळी पाच ते आठदरम्यान सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे दूध घेण्यासाठी त्या-त्या भागातील डेअरींवर नागरिकांची तुरळक उपस्थिती पाहायला मिळाली. इतरत्र मात्र शुकशुकाटच होता. शासकीय कार्यालये सुरू असल्याने नोकरदार वर्गाचे येणे-जाणे सुरू होते. ही किरकोळ उपस्थिती वगळता दिवसभर शहरात शांतता पाहायला मिळाली. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT