banana transport
banana transport 
उत्तर महाराष्ट्र

नोकरीत असताना जमले नाही ते सेवानिवृत्‍तीनंतर केले; सातासमुद्रापार केळी

कमलेश पटेल

शहादा (नंदुरबार) : नोकरीत असताना शेतीकडे दुर्लक्ष झाले. मात्र, शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर अवघ्या पाच वर्षांपूर्वी शेतीत रममाण झालेल्या पाडळदा (ता. शहादा) येथील निवृत्त उपअभियंता शरद पाटील यांनी ज्ञानाच्या जोरावर केळीची लागवड केली. पूर्णवेळ शेतीत खर्च केला. वेगवेगळे प्रयोग, तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन केळी इराण, इराक, ओमान या आखाती देशांमध्ये पाठविली. शेतीत नवखे असूनही जिद्दीने सातासमुद्रापार केळी पोचविली. 
पाडळदा (ता. शहादा) येथील शरद पाटील यांनी निवृत्तीनंतर वडिलोपार्जित शेतीत वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत, नवीन काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगून, तज्‍ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन त्यांनी पाच वर्षांपूर्वी शेती कसणे सुरू केले. त्यात त्यांनी अवगे जुनवणे शिवारातील पाच एकर क्षेत्रात ‘जी- नऊ’ प्रकाराच्या सहा हजार केळीच्या रोपांची ठिबक सिंचनावर लागवड केली. त्यांच्या केळी बागेला अनेकांनी भेटी दिल्या, तर काहींनी मार्गदर्शन केले. केळीला सध्या बाराशे रुपयांहून अधिक दर मिळत आहे. परिसरात असलेल्या लोकल मार्केटपेक्षा निश्चितच भाव जास्त मिळतो. त्या मुळे शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळत असल्याने परदेशात निर्यात वाढली आहे. 

जिल्‍ह्यातून ७०० ते ८०० कंटेनर आखाती देशात 
जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड झाली आहे. केळीच्या दर्जानुसार तोडणी होते. तोडणी केल्यानंतर बॉक्स पॅकिंग करून गाडी भरली जाते. थेट मुंबईला रवाना झाल्यानंतर ३० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवले जाते. तद्‌नंतर बंदरावर कंटेनरमध्ये भरून जहाजाद्वारे आखाती देशांमध्ये रवाना होते. एका हंगामात तालुक्यातून विविध खरेदीदार कंपन्यांकडून सुमारे ७०० ते ८०० कंटेनर केळी आखाती देशात पाठविली जाते. 

योग्य नियोजन, मेहनत 
श्री. पाटील यांनी ऊस, पपई, मिरची या पिकांसोबत पाच एकरांत केळी रोपांच्‍या लागवडीपासून ते काढणीपर्यंत विंट्रेक्स क्रॉप केअर कंपनीचे नंदकुमार पाटील, विनायक धाबुगडे यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी वेळोवेळी सुचविलेल्या उपयांनुसार रोपांची वाढ होण्यासाठी खतांची मात्रा व पाण्याचे योग्य नियोजन करून केळीची बाग फुलविली. शेतीत नवखे असूनही आखाती देशात केळी जात आहे, याचा मनस्वी आनंद होत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 
 
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नवनवीन प्रयोग करून शेती कसल्यास निश्चितच दोन पैसे जास्त मिळतात. भविष्यातही वेगवेगळे प्रयोग करून यशस्वी शेती करण्याचा मानस आहे. 
-शरद पाटील, निवृत्त उपअभियंता, शहादा 

संपादन ः राजेश सोनवणे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT