meter reading
meter reading 
उत्तर महाराष्ट्र

चुकीच्या मीटर रीडिंगमुळे ग्राहकांना अवाजवी बिल 

सकाळवृत्तसेवा

अक्कलकुवा (नंदुरबार) : खापर येथे महावितरण कंपनीकडून मीटर रीडिंग न घेता अंदाजे बिलांची आकारणी आणि विजेचा वापर कमी तरी बिल मात्र जास्तच येत असल्याने अक्कलकुवा तालुक्यातील विविध गावांतील नागरिक त्रस्त आहेत. 

महावितरणाचा कामाचा भार कमी व्हावा, यासाठी तालुक्यात शहादा येथील कृष्णा एजन्सी ही रीडिंग घेण्यासाठी नेमण्यात आली आहे. दरमहा नियमित रीडिंग घेण्याचे काम या एजन्सीचे असूनही मीटर रीडिंग न घेता अंदाजे रीडिंग देते. दिली जाणारी अंदाजे रीडिंग ही सरासरीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. ग्राहकांना मिळणारे वीजबिल आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात असल्याने ते भरणे कठीण झाले आहे. त्यात महावितरणचे कर्मचारी वाढीव आलेल्या बिलात थोडे फार कमी-जास्त करून वीजबिल भरणे सक्तीचे करून, ग्राहकांच्या घरी चकरा मारून अव्वाच्या सव्वा वीजबिल भरण्यासाठी आग्रह धरतात. कोरोनामुळे शेतकरी, कामगार, व्यावसायिक, मजूर यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. या स्थितीतून नुकतेच बाहेर पडत असताना त्यात वाढीव वीजबिल देऊन महावितरणाने जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

चोरी दुर्लक्षित, वाढीव बिलासाठी सक्ती 
वीजचोरीवर कारवाई होत नसल्याने खुलेआम आकडे टाकून मोठ्या प्रमाणात वीजचोरी होते. चोरी रोखण्यासाठी येथील महावितरणाचे अधिकारी दुर्लक्ष करतात. परिणामी वीजचोरी करणाऱ्यामुळे मीटर असलेल्या ग्राहकांना नाहक त्रास होतो. मीटरधारक ग्राहकांना वाढीव बिल भरणे सक्तीचे केले जाते आणि आकडे टाकून वीजचोरीला अधिकाऱ्यांकडून खुली सूट का दिली जाते, हा प्रश्न उपस्थित होतो.  

संपादन ः राजेश सोनवणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT