residenational photo
residenational photo 
उत्तर महाराष्ट्र

अंगणवाडी केंद्राच्या कामाचे पितळ उघड 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : महिला व बालकल्याण समिती सभापती अर्पणा खोसकर यांनी अंगणवाड्यांना दिलेल्या सरप्राईज भेटीतून जिल्ह्यातील काही अंगणवाडीची दुर्दशा समोर आणत अंगणवाडी केंद्राच्या कामाचे पितळच उघड केले आहे. तातडीने संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अर्पणा खोसकर यांनी शुक्रवारी (ता.16) जिल्ह्यातील आशेवाडी, राशेगाव (वीटभट्टी), राशेगाव क्रमांक 1, उमराळे आणि वाघाड येथील अंगणवाडी केंद्रांना सरप्राईज भेट दिली असता त्यांना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अंगणवाडी केंद्र चालवितांना सेविका आणि मदतनीस ह्या स्थानिक असाव्यात असा शासननियम असताना भेटीतील अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस यां आपल्या गावावरून ये-जा करत असल्याचे आढलले. वेळ उलटूनही अंगणवाडी साध्या उघडल्याही गेल्या नव्हत्या तर काही सभापतींच्या उपस्थितीत उघडण्यात आल्या, अनेक अंगणवाडी सेविका ह्या जागेवर उपस्थित नसल्याचा दिसून आले. स्वयंपाकगृहे अस्वच्छ असल्याचे दिसल्याने येथे खरच नियमित आहार शिजविला जातो की नाही? यावर शंका उपस्थित केली. 

काही केंद्रांमध्ये पोषण आहाराची साधी तयारीही नसल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांकडे विचारपूस केली असता अमृत आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी देण्याचा निर्णय असतानाही अंडी मिळत नसल्याचे विद्यार्थींनी सांगितले. अनेक अंगणवाडीमध्ये विद्यार्थी नसल्याने अमृत आहार दिला जातो की नाही यावर देखील शंका उपस्थित केली. अंगणवाडी सेविका उपस्थित नसल्याने दप्तर तपासणी आणि शेरे पुस्तिका कपाटात बंद असल्याने तपासता आले नाही त्यामुळे अनागोंदी कारभार देखील होत असल्याचा संशय बळावला आहे. 
अंगणवाडीच्या सरप्राईज व्हिजिटमध्ये अंगणवाडी क्रेंद्राचे असे विदारक दृश्‍य दिसल्याने सभापती यांनी यावर आपला राग व्यक्त करत संबंधित दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. प्रशासनाकडून देखील या गोष्टींकडे साफ दुलर्क्ष होत असल्याचे दिसत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. 

सभापतींकडून जिल्ह्यातील केवळ पाच अंगणवाडी क्रेंद्राना भेट दिल्या तर त्यांची ही अवस्था आहे. यावरून जिल्ह्यातील इतर अंगणवाडी केंद्रांची काय स्थिती असेल त्यांचा कामाकाज कसा होत असेल त्यांच्या कामाकाजाची नियमित दप्तर तपासणी होते की नाही? यावर शंका घेतली जात आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT