Garbage dhule
Garbage dhule 
उत्तर महाराष्ट्र

कोरोनाचा असाही परिणाम..."कचऱ्या'चीही "आवक' घटली 

रमाकांत घोडराज

धुळे : कोरोनाच्या संकटाने जगभरात मानवाची हालचालच "बंदिस्त' केल्याने त्याचा प्रत्येक गोष्टीवर परिणाम दिसून येत आहे. शहरातून दररोज निघणाऱ्या कचऱ्यावरदेखील कोरोनाचा इफेक्‍ट पडला आहे. लॉकडाऊननंतरच्या काळात महापालिकेच्या कचरा डेपोवर नेहमीपेक्षा दररोज साधारण 30 ते 40 मेट्रिक टन कचरा कमी जात आहे. ही सरकारी आकडेवारी असल्याने वस्तुस्थिती आणखी वेगळी असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कचरा कमी झालाय एवढं मात्र नक्की. 
एकीकडे कोरोनामुळे मानव प्राण्यावर संकट ओढवले आहे. तर दुसरीकडे प्रदूषण कमी होणे, जंगली प्राण्यांना मुक्तसंचार करता येणे अशा काही दिलासादायक गोष्टीही पाहायला मिळत आहेत. कोरोनामुळे मानवनिर्मित कचराही कमी झाला का असाही एक प्रश्‍न आहे. धुळे शहराचाच विचार केला तर महापालिकेच्या कचरा डेपोवर लॉकडाऊनंतर कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. 

30-40 टन कचरा कमी 
कोरोनामुळे लागलेली संचारबंदी, लॉकडाऊनमुळे नागरिकांकडून होणारे बाहेरचे सर्वच व्यवहार बंद असल्याने साहजिकच कचरा निर्मितीचे प्रमाणही कमी झाले आहे. घराघरातला कचरा मात्र निघतोच आहे. लॉकडाऊननंतर मात्र कचऱ्याचे हे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. कोरोना संकटाच्या पूर्वी विशेषतः लॉकडाऊनपुर्वी दररोज साधारण 200 मेट्रिक टनापर्यंत कचरा महापालिकेच्या कचरा डेपोवर जात होता. 24 मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर मात्र कचऱ्याचे हे प्रमाण कमी झाले आहे. आत्ता दररोज 160 ते 170 मेट्रिक टन कचरा डेपोवर येत असल्याचे सहाय्यक आरोग्याधिकारी लक्ष्मण पाटील यांनी सांगितले. 

तक्रारीही झाल्या कमी 
लॉकडाऊन नंतरच्या काळात कचरा संकलनाबाबत नागरिकांसह नगरसेवकांच्या तक्रारीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची किमान एक डोकेदुखी कमी झाल्याचे दिसते. 
 
"करारा'प्रमाणे निघतोय कचरा 
महापालिकेने कचरा संकलनाचे काम खासगी ठेकेदाराला दिले आहे. तीन वर्षासाठी एकूण 17 कोटी 79 लाख 16 हजार 914 रुपये खर्चातून हे काम देण्यात आले आहे. 918 रुपये मेट्रिक टन या दराप्रमाणे ठेकेदाराला मोबदला दिला जातो. या कचरा संकलनाच्या करारात शहरातून दररोज 168 मेट्रिक टन कचरा निघतो व तो उचलणे ठेकेदाराकडून अपेक्षित असल्याचे नमूद आहे. मात्र, 168 मेट्रिक टनांपेक्षा जास्त (साधारण 200 मेट्रिक टन) कचरा दररोज डेपोवर जातो. लॉकडाऊननंतरच्या काळात मात्र हे प्रमाण 160-170 मेट्रिक टनापर्यंत आल्याने एका अर्थाने कराराप्रमाणे सध्या कचरा संकलन सुरू असल्याचे दिसते. याच करारात 135 मेट्रिक टनांपेक्षा कमी कचरा उचलला गेल्यास ठेकेदाराकडून दंड वसूल करण्याचीही तरतूद आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT