उत्तर महाराष्ट्र

राज्यात गुटखा बंदी तरी..धुळ्यात दीड कोटीचा गुटखा पकडला !

भूषण श्रीखंडे


धुळे : सुरत बायपास रस्त्यावर हॉटेल जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ( dhule local crime branch) बुधवारी (ता. १२) रात्री छापा घातला. तीन आयशरमधून कोट्यवधींचा गुटखा (Gutkha) जप्त केला. या प्रकरणी दोन आयशरचालकांना (truk) ताब्यात घेण्यात आले.

( maharashtra banned gutkha one crore found police action dhule)

परराज्यातून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा पानमसाल्याची तस्करी होत असल्याच्या तक्रारी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांना मिळाल्या. या पार्श्वभूमीवर श्री. पंडित यांनी विविध पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक आणि एलसीबीला कारवाईचे आदेश दिले. प्राप्त आदेशावरून एलसीबीचे पथक कामाला लागले. पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्‍यांनी गुटखा तस्करीबाबत माहिती घ्यायला सुरवात केली. साक्री रोडवरील सुरत बायपास येथे दोन आयशर उभ्या आहेत. त्यामध्ये विमल गुटखा असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. माहितीची खातरजमा करत एलसीबीच्या पथकाने बायपासजवळील महेंद्र हॉटेलसमोर उभ्या असलेल्या आयशर (एमएच ४८, बीएम ३७१७) व (एमएच ४८, एजी ३७११)ची तपासणी केली. एका आयशरमध्ये ४५ लाख ७६ हजार रुपयांचा, तर दुसऱ्‍या आयशरमध्येदेखील तेवढ्याच किमतीचा विमल पानमसाला गुटखा आढळून आला. बुधवारी (ता. १२) रात्री ही कारवाई झाली.

गुरुवारी (ता. १३) धुळे-साक्री रस्त्यावर नेर (ता. धुळे) गावाजवळील बच्छराज हॉटेलसमोर उभ्या असलेल्या आयशर (एमएच ४८, एवाय ३९२९)ची एलसीबीने तपासणी केली असता त्यामध्ये ४५ लाख ७६ हजार रुपयांचा विमल गुटखा आढळून आला. या दोन्ही कारवायांमध्ये एलसीबीच्या पथकाने विमल गुटखा आणि तीन आयशर मिळून एक कोटी ५२ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी वाहनचालक महेंद्र रामनवल तिवारी (रा. कल्याणपूर, उत्तर प्रदेश), प्रमोद जटाशंकर उपाध्याय (रा. नयापूर, वाराणसी, उत्तर प्रदेश) व गोवर्धन जंगीलाल गौड (रा. नरहन, जौनपूर, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीआय शिवाजी बुधवंत, पीएसआय सुशांत वळवी, पीएसआय योगेश राऊत, हवालदार श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप थोरात, सुनील विंचूरकर, रफिक पठाण, महेंद्र कापुरे, संजय पाटील, पोलिस नाईक संदीप पाटील, रवींद्र माळी, संतोष हिरे, संदीप सरग, प्रकाश सोनार, अशोक पाटील, गौतम सपकाळे, हेमंत सोनवणे, मनोज पाटील, चेतन कंखरे, उमेश पवार, विशाल पाटील, राहुल सानप, रवी राठोड, मनोज बागूल, महेश मराठे, तुषार पाटील, श्रीशैल जाधव, सागर शिर्के, योगेश जगताप, किशोर पाटील आदींनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT