उत्तर महाराष्ट्र

आमदार गोटेंच्या "शिट्टी'ची हवाच काढून घेण्याचा प्रयत्न! 

सकाळवृत्तसेवा

धुळे ः येथील महापालिका निवडणुकीत भाजपविरोधातच बंड पुकारणारे या पक्षाचे आमदार अनिल गोटे यांनी स्वकियांसह विरोधकांची हवा गुल करण्यासाठी "शिट्टी' चिन्ह मिळावे, असा आग्रह धरला आहे. मात्र, हे चिन्ह मिळू नये म्हणून विरोधक प्रयत्नशील असल्याची कुजबूज गोटे समर्थकांमध्ये आहे. दुसरीकडे नियमानुसार हे चिन्ह राखीव ठेवता येत नाही, असे पत्र निवडणूक यंत्रणेने आमदार गोटे यांना दिले आहे. 
पूर्वीच्या निवडणुकीत आमदार गोटे यांनी "शिट्टी' चिन्ह घेतलेले आहे. त्या वेळी त्यांनी शहरात मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना शिट्टीचे मोफत वाटप केले. संपूर्ण शहरात काही दिवस तर शिट्टीचा आवाज दिवसभर घुमत होता. त्यातून आमदार गोटे यांचा आपोआप प्रचार होत होता. सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीत भाजपशी फारकत झाल्याने आमदार गोटे यांनी पुन्हा "शिट्टी' चिन्ह मिळावे, असा आग्रह निवडणूक यंत्रणेकडे धरला. गेल्या निवडणुकीत असे चिन्ह घेतले असेल आणि पाच टक्के प्रमाणात उमेदवार निवडून आलेले नसतील, तर ते चिन्ह देणे बंधनकारक नाही, असा नियम आहे. असे चिन्ह "मुक्त चिन्हा'त मिळू शकते. अशा नियमाचा आधार घेत निवडणूक यंत्रणेने शिट्टी चिन्ह राखीव ठेवता येत नाही, देता येत नाही, असे पत्र आमदार गोटे यांना दिले आहे. त्यामुळे शिट्टी चिन्हासाठी आमदार गोटे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. या घडामोडींमुळे निवडणुकीत वेगळीच रंगत भरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT