anil gote
anil gote 
उत्तर महाराष्ट्र

भाजपला महापुरूषांविषयी आत्मीयता नाही : अनिल गोटे

सकाळ वृत्तसेवा

साक्री : दोन वर्षांत तीन हजार कोटींच्या खर्चातून लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक होते. मग राज्यात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक का होऊ शकत नाही, असा प्रश्‍न उपस्थित करत प्रदेश भाजपला महापुरुषांविषयी आत्मीयता नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले. 


येथील बाजार समितीत पत्रकार परिषदेसह कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे, "राष्ट्रवादी'चे प्रांतिक सदस्य सुरेश सोनवणे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, सरचिटणीस प्रा. नरेंद्र तोरवणे, तालुकाध्यक्ष जितेंद्र मराठे, पंचायत समिती उपसभापती ऍड. नरेंद्र मराठे, महिला आघाडीच्या उज्ज्वला बेडसे, प्राजक्ता देसले, विलास देसले, राजेश बागूल, भाऊसाहेब टिळे, विठ्ठल मारनर, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष कल्पेश सोनवणे, अक्षय सोनवणे, भूषण बोरसे, सतीश पगार आदी उपस्थित होते. 
श्री. गोटे म्हणाले, की "बंद' पांझरा-कान सहकारी कारखाना सुरू होऊ शकला, त्याचा किमान एक हंगाम होऊ दिल्यास कामगारांच्या थकीत देणीचा प्रश्‍न सुटू शकतो. सहकार्य मिळाल्यास महाविकास आघाडी सरकार प्रश्‍न सोडवू शकेल. देशात तेढ निर्माण करण्यासाठीच नागरिकत्व सुधारणा कायदा आणण्यात आल्याचा आरोप श्री. गोटे यांनी केला. मात्र, भांडण न करता बंधुभाव जोपासला जावा, असे ते म्हणाले. तसेच पक्षीय कार्यकर्त्यांनी "राष्ट्रवादी'ला मजबूत करावे, असे आवाहन केले. 
 
त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करू 
"राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांनी आपापसांतले मतभेद दूर करून कामाला लागावे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करू, असे श्री. गोटे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT