live
live 
उत्तर महाराष्ट्र

स्विफ्ट गाडीसह बासठ्ठ किलो गांजा जप्त, तीन संशयीत ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

स्विफ्ट गाडीसह बासठ्ठ किलो गांजा जप्त, तीन संशयीत ताब्यात,गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी

म्हसरूळ (नाशिक) - स्विफ्ट गाडीतून गांजा शहरात विक्री करण्यासाठी आणणाऱ्या तीन संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकने तपोवनातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ जेरबंद करण्यास यश आले. या संशयितांकडून स्विफ्ट गाडीसह बासठ्ठ किलो गांजा असा एकूण आठ लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर यांना काही संशयीत नाशिक शहरात गांजा विक्री करण्यासाठी घेऊन असल्याचे समजले. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी ,पोलीस उपनिरीक्षक बलराम पालकर ,सहायक पोलीस उपनिरीक्षक कारवाळ,पोलीस हवालदार संजय मुळक,वसंत पांडव,दिघोळे, येवाजी महाले,बागुल ,पोलीस नाईक शांताराम महाले,पोलीस शिपाई गणेश वडजे,विशाल काठे,दिपक मोंढे, महिला पोलीस शिपाई पोखरकर यांनी सापळा रचुंन संशयीत धनराज पवार (रा.निफाड),युवराज मोहिते (रा.विडीकामगार नगर,आडगाव),प्रशांत नारळे (रा.कुमावत नगर,पंचवटी) यांना तपोवनातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ स्विफ्ट क्रमांक एमएच१२एफयु४०२० सह जवळपास बासठ्ठ किलो गांजा असा एकूण आठ लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT