उत्तर महाराष्ट्र

मतदानाच्या दिवशी अडीच लाखांची दारू जप्त 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः शहरातील कंजरवाडा, जाखनीनगर, तांबापुरा या भागांत "ब्लॅक'ने विदेशी आणि देशी दारू विक्रेत्यांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. देशी- विदेशी आणि हातभट्टी अशा एकूण दोन लाख 47 हजार 92 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानासाठी सर्वत्र तीन दिवस "ड्राय-डे' पाळला जात आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदरपासून जिल्ह्यातील आणि शहरातील बिअरबार वाइनशॉप बंद ठेवण्याचे आदेश पारीत करण्यात आले असताना जळगाव शहरात "ब्लॅक'ने दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना मिळाली होती. त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, दीपक चौधरी यांच्या पथकाने विविध ठिकाणी छापे घातले. त्यात कुसुंब्यात देशी-विदेशी दारू विक्री करताना भूषण प्रभाकर इंगळे (वय 30, रा. दहिगाव, ता. यावल) आढळून आला. त्याच्या ताब्यातून 14 विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या; तर सुप्रीम कॉलनीत एमआयडीसी नाल्याजवळ अंजू अर्जुन कंजर गावठी हातभट्टी लावून दारू गाळताना आढळून आली. तिच्याजवळून एक लाख 51 हजार रुपये किमतीचे तीन हजार 600 लिटर गूळ व नवसागरमिश्रीत कच्चे दारूचे रसायन 18 ड्रम, भट्टीवर तयार होत असलेले 200 लिटर उकळते दारूचे रसायन 10 हजार रुपये किमतीचे, साडेचार हजारांची 70 लिटर तयार दारू असा एकूण एक लाख 69 हजार 600 रुपयांचा माल जप्त करून नष्ट करण्यात आला. त्यासोबतच जाखनीनगर, कंजरवाडा भागात 76 हजार रुपयांच्या हातभट्टीच्या दारूसह विदेशी दारूच्या 19 बाटल्या जप्त करून उषाबाई यशवंत गारुंगे (वय 45, रा. जाखनीनगर) हीस अटक करण्यात आली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पथकाने मतदानाच्या दिवशीच दोन लाख 47 हजार 92 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना अटक करून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT