residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

पतीचा खून करणाऱ्या पत्नीस जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : अनैतिक संबंधाच्या कारणावरुन वाद झाल्याने पती मोहंमद सज्जाद मोहम्मद बशीर (रा. अक्सा कॉलनी, रमजानपूरा) यांचा चाकूने वार करुन खून केल्याचा आरोप सिध्द झाल्याने पत्नी नाजीया मोहंमद सज्जाद (वय २८) हिला येथील जिल्हा व अपर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एच. मोहंमद यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. नाजियाचा प्रियकर शेख मोहंमद आसिफ शेख जमीर (२८, रा. मुंबई) याची न्यायालयाने संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली.
   

    या खटल्याची पाश्‍र्वभूमी अशी : नाजिया मोहंमद व शेख मोहंमद आसिफ यांचा १६ जून २०१५ ला विवाह झाला होता. शेख मोहंमद आसिफ कामाच्या निमित्ताने कुवेत येथे राहत असल्याने त्याची आई माजदा शेख हिच्या सांगण्यावरुन त्याने नाजियाला तलाक दिला होता. त्यानंतर नाजियाचा मोहंमद सज्जाद याच्याशी दुसरा विवाह झाला. यानंतरही नाजिया व शेख मोहंमद आसिफ यांचे विवाहबाह्य प्रेम संबंध होते. मोहंमद आसिफ १३ डिसेंबर २०१८ ला कुवेत येथून मुंबई येथे त्याच्या घरी आला. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०१८ ला त्याची पहिली पत्नी तबस्सुम हिचेकडे रमजानपुरा मालेगाव येथे आला. याच दिवशी मोहंमद आसिफ नाजियाला भेटण्यासाठी आला. ते दोघे मोटारसायकलीवरुन पळून जाण्याच्या बेतात असतानाच तिचा पती मोहंमद सज्जाद याच्या लक्षात आले. त्याने विरोध केला.

दोघांना शिताफीने अटक

    नाजिया व मोहंमद सज्जाद या पती पत्नीमध्ये झटापटी झाली. नाजियाने किचनमध्ये ठेवलेला चाकू पतीच्या डोक्यात मारला. गंभीर जखमी होऊन मोहंमद सज्जाद ठार झाला. घटनेनंतर नाजिया व मोहंमद आसिफ फरार झाले. मयत मोहंमद सज्जादचा भाऊ मोहंमद समशाद याने रमजानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन दोघा संशयितांना अटक केली. सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अशोक पगारे यांनी बाजू मांडत दहा साक्षीदार तपासले. आरोप सिध्द झाल्याने न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT