उत्तर महाराष्ट्र

तेरा तालुक्‍यांतील पिके धोक्‍यात 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यातील 13 तालुक्‍यांमध्ये 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. खरिपाची पिके केवळ नावाला उभी आहेत. जनावरांसाठी लागणारा चारा अल्प प्रमाणात आहे. रोजगार हमी योजनेंतर्गतही कामे नसल्याचे चित्र आहे. गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचा पीक सर्वेक्षण अहवालप्राप्त जिल्हा प्रशासन उद्या (ता. 20) विभागीय आयुक्तांकडे पाठविणार आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येऊन गेल्यानंतर जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांचे सर्व्हेक्षण करण्यावर भर दिला. त्यात जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, बोदवड, पारोळा या 13 तालुक्‍यांमध्ये पीक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पिकांची स्थिती अतिशय नाजूक असून उत्पादन येण्याची स्थिती नाही. रब्बीचा हंगामही संकटात आहे. याबाबतचे चित्र स्पष्ट झाले. 
 
तीन पातळीवरही अहवाल सादर 
पिकांच्या स्थितीसोबतच पाणीपुरवठा, जनावरांसाठी लागणारा चारा, रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध होणारा रोजगार याचाही अहवाल विभागीय आयुक्‍तांनी मागविला होता. त्यानुसार वरील तालुक्‍यात तीव्र पाणीटंचाईची चिन्हे आहे, चाऱ्याचा साठा अत्यल्प आहे. फेब्रुवारी अखेर चाराटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. रोजगार हमी योजनेबाबतही फेब्रुवारीपर्यंत रोजगार उपलब्ध होणार नाही, अशी स्थिती असल्याचा अहवाल आज तयार केला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. विभागीय आयुक्तांकडून हा अहवाल 23 ऑक्‍टोबरला शासनाकडे पाठविला जाणार आहे. 31 ऑक्‍टोबरपर्यंत दुष्काळाची परिस्थिती जाहीर केली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT