live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

पाडळसे धरणपूर्ततेसाठी बळीराजाची वज्रमूठ 

सकाळवृत्तसेवा

अमळनेर : महत्वाकांक्षी प्रकल्प पाडळसे धरणाच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी वज्रमूठ बांधली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाडळसे जनआंदोलन समितीतर्फे आज सकाळी अकराला रणरणत्या उन्हात विराट मूकमोर्चा काढण्यात आला. अमळनेरसह पारोळा, चोपडा, धरणगाव व धुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यात अनेक संघटना, पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून, बाजारपेठातील सर्व दुकाने बंद आहेत. 
प्रताप मिल कंपाऊंडपासून मोर्चा सुरवात झाली असून, सुभाष चौक, दगडी दरवाजा, बसस्थानक, विश्रामगृह चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला आहे. ठिकठिकाणी पाडळसे जनआंदोलन समितीचे बॅनर लावण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसापासून मोर्चात सहभागी होण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर भाजीपाला बाजार, सराफ बाजार, दाणा बाजार, गंगाघाट, बसस्थानक परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक संघटनांकडून थंड पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तहसील आवारात मोर्चा आल्यावर एका सभेत मोर्चाचे रूपांतर झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT