उत्तर महाराष्ट्र

भुसावळला पून्हा पाच कोरोना बाधीत रुग्ण आढळले 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून त्यात भुसावळ, जळगाव शहरात रुग्णांची संख्या दिवस वाढत आहे. त्यात आज भुसावळ व भडगाव येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी 30 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 24 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पाच व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून एका 
व्यक्तीचा पुर्नतपासणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 455 झाली आहे. नुकताच आलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती भुसावळ शहरातील फालक नगर, गुंजाळ कॉलनी, गांधीनगर 
व दिपनगरातील आहे. त्यामुळे भुसावळ शहरातील रुग्णसंख्या आता 111 झाली असल्याने भुसावळकरांची चिंता आता वाढलेली आहे. 

भुसावळची परिस्थीती चिंताजनक 
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 455 इतकी झाली आहे. त्यात शंभरीपार असलेल्या कोरोना बाधीत रुग्णसंख्येत आधी अमळनेर टॉपवर होते. तसेच जळगाव शहर आणि आता गेल्या तिन-चार दिवसात वाढत असलेल्या रुग्णसंख्येने भुसावळ शहराची परिस्थीती चितांजनक झाली असून शहराची रुग्णसंख्या 111 झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT