uday wagh
uday wagh 
उत्तर महाराष्ट्र

Loksabha 2019 : मोदी लाट कायम, भाजपची तटबंदी भेदणे अशक्‍य : उदय वाघ 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत देशात विकासकामे वेगाने केली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही लाभ झाला आहे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. मोदी यांची लाट या निवडणुकीतही अधिक वेगवान झालेली दिसून येईल. त्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पालापाचोळाही वाहून जाईल, असा विश्‍वास भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी "सकाळ संवाद' कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गोलाणी (व. वा.) संकुलातील "सकाळ'च्या शहर कार्यालयात संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी लोकसभा निवडणुकीतील तयारी तसेच पक्षाच्या धोरणांबाबत दिलखुलास चर्चा करताना अनेक प्रश्‍नांना बेधडक उत्तरेही दिलीत. 
 
प्रश्‍न : जिल्ह्यात अद्यापही उमेदवारांची घोषणा नाही, तयारीचे काय? 
उत्तर : भारतीय जनता पक्षाला उमेदवार कोण याची कधीच चिंता नसते. आमचा कार्यकर्ता हा निवडणुकीस कायम सज्ज असतो. एक निवडणूक संपली म्हणजे आमचा कार्यकर्ता निवांत बसत नाही. आम्ही दुसऱ्या निवडणुकीची तयारी करतो. जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले होते. आमची बूथ रचना तसेच सर्व यंत्रणा तयार आहे. "कमळ' हाच आमचा उमेदवार असून, वरिष्ठ नेता देईल त्याचा कार्यकर्ते प्रचार करतील. 

प्रश्‍न : कथित "क्‍लीप'मुळे पक्ष "डॅमेज' झाला आहे काय? 
उत्तर : व्हायरल झालेल्या कथित "क्‍लीप'ची चौकशी पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर सुरूच आहे. त्यातून सत्य काय ते बाहेर येईलच. त्यामुळे पक्ष "डॅमेज' झाला असे म्हणता येणार नाही. प्लान "ए' आणि प्लान "बी' आमच्याकडे तयार असतो. त्यामुळे पहिला प्लान फेल गेल्यास आम्ही दुसऱ्या प्लानचा उपयोग करतो. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्याचीही आमच्याकडे यंत्रणा तयार आहे. 

प्रश्‍न : स्मिता वाघ जळगावच्या उमेदवार असतील? 
उत्तर : पक्षाच्या पद्धतीप्रमाणे स्मिता वाघ यांनीही उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. दिल्ली येथे पार्लमेंटरी बोर्डाकडे त्यांचे नाव गेलेले आहे. याबाबत पक्षाकडूनच निर्णय होईल आणि त्या उमेदवार असतील की नाही, याचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डच घेईल. 

प्रश्‍न : माजी मंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील वादाचा निवडणुकीत पक्षावर परिणाम होईल? 
उत्तर : गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे हे दोन्ही पक्षाचे नेते आहेत. पक्षाच्या वाढीसाठी त्यांचे योगदान आहे. त्यांच्यात मतभेद आहेत; परंतु मनभेद नाहीत. वेळोवेळी त्यांनी आपापले मत व्यक्त केले. काहीवेळा त्यांच्या मनासारखेच होईल, असेही नाही. अशा स्थितीत पक्षाशी त्यांनी कधीही प्रतारणा केलेली नाही. त्यामुळे त्यांच्यातील वादाचा पक्षाच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही. दोन्ही नेते जोमाने पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतील. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात भाजपचे खासदार निवडून येतील. 

प्रश्‍न : रावेर मतदारसंघात तयारीबाबत कुणाला आदेश दिलेत काय? 
उत्तर : पक्षात उमेदवारीबाबत काम करण्याचे आदेश देण्याची प्रथाच नाही. या मतदार संघात पक्षातर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे आणि अजय भोळे यांनी इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर चर्चा करून निर्णय होईल. 

प्रश्‍न : मित्र पक्ष शिवसेना दोन्ही मतदारसंघात नाराज आहे, भाजपच्या उमेदवाराचे काम न करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे? 
उत्तर : आता युती झालेली आहे. जिल्ह्यातही दोन्ही पक्षांमधील संबंध चांगले आहेत. मात्र, आपापल्या पक्षाचा विस्तार करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. त्यामुळे आरोप- प्रत्यारोप होत असतात; परंतु आता रविवारी (ता. 17) दोन्ही पक्षाच्या नाशिक विभागातील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नाशिक आयोजित केली आहे. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र येऊन वाद मिटविले जातील. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते युतीधर्म पाळून कार्य करतील. 

प्रश्‍न : भाजपकडून निवडणुकीत पैशाचा वापर केल्याचा आरोप होतो, त्याबाबत काय सांगाल? 
उत्तर : भाजपने निवडणुका जिंकल्या की, पैशाचा वापर, इव्हीएमचा घोटाळा असे आरोप होतात. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने यश मिळविले तर सरकारच्या विरोधात जनमत असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे आपल्या पराभवाबद्दल विरोधकांनी आत्मपरीक्षण करायला हवे. 
 
पैशाची नव्हे कार्यकर्त्यांची श्रीमंती 
पैशाच्या वापराच्या मुद्यावर बोलताना उदय वाघ यांनी आणखी एक जोड दिली. भाजपकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. संघटनेतून हे कार्यकर्ते तावून सुलाखून तयार झाले आहेत. पैशाची नव्हे, तर कार्यकर्त्यांची श्रीमंती असलेला पक्ष आहे, असे ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT